फडणवीस आडनाव कसे पडले? राज ठाकरेंनी सांगितला इतिहास 

मी ज्या ज्यावेळी त्यांचे व्याख्यान ऐकली, आजही ऐकतो तेव्हा मला प्रत्येक वेळा वाटते ते फक्त शिवचरित्र सांगत नाहीत.
 Raj Thackeray .jpg
Raj Thackeray .jpg

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत झालेल्या भेटींवीशयी सांगितले. यावेळी ठाकरे यांनी फडणवीस हे आडनाव कुठून आले? हे आडनाव कसे पडले? याचा इतिहासच सांगितला. (Raj Thackeray met Babasaheb Purandare) 

यावेळी राज ठाकरे म्हणाले, आपल्याकडे अनेक शब्द आहेत ते फारसी आहेत. मात्र, ते आपल्याला माहीत नाहीत. अनेक आडनावे कशावरून आली हे माहीत नाही. उदाहरणच सांगायचे झाले तर 'फडणवीस' हे काही मुळात अडनाव नाही. ते मूळचे पर्शियन नाव आहे 'फर्द नलीस'. 'फर्द' म्हणजे कागद आणि 'नलीस' म्हणजे लिहिणारा. म्हणजे 'फर्द नलीस'. नंतर ते फडावर लिहिणे आले म्हणून ते फडणवीस असे झाले. असे त्यांनी सांगितले. आडनावे कशी असतात? ती कशी पडली? कुठून आली? यात मला रस आहे, असल्याचे राज यांनी सांगितले. महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ कुठून आले? कसे आले? चपाती, पोळी कुठून आले? महाराष्ट्रात गहू नव्हता. मग गहू कसा आला कुठून? अशा अनेक गोष्टी आहेत. त्या भूगोल आणि इतिहासाशी संबंधित असतात. या विषयावर बाबासाहेब माझ्याशी बोलले त्याबद्दल मी मला भाग्यवंत समजतो, असेही राज म्हणाले.  

परवा मी बाबासाहेबांना भेटलो. त्यावेळी ते म्हणाले, आनंदी आहे. पण समाधानी नाही. ते खरेच आहे. ज्या ज्या वेळी मी त्यांना भेटलो, त्या त्यावेळी नवीन खजाना भेटल्याचे मला वाटले. आपल्या छत्रपतींबद्दल अजून नवीन माहिती, इतिहासाबद्दल आणखी काही नवे त्यांच्याकडून ऐकायला मिळाले. लहानपणापासून मी त्यांची अनेक व्याख्याने ऐकली आहेत. शिवछत्रपतींचे चरित्र अनेकदा वाचून झाले. 

मी ज्या ज्यावेळी त्यांचे व्याख्यान ऐकली, आजही ऐकतो तेव्हा मला प्रत्येक वेळा वाटते ते फक्त शिवचरित्र सांगत नाहीत. 2021 मध्ये आपण कसे जगले पाहिजे हेही ते सांगत असतात. आपण नियमीत कसे सावध असले पाहिजे, म्हणजे देशातील हिंदुंनी मराठी समाजाने किती सावध असले पाहिजे, किती सतर्क असले पाहिजे हे या इतिहासातून मला वाटते ते सतत सांगण्याचा प्रयत्न सर्वांना करत आले, असे राज ठाकरे म्हणाले. 
 
Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com