राहुल कुल सहा वर्षांनंतर भेटले अजित पवारांना 

आमदार राहुल कुल यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती.
Rahul kool met Ajit Pawar after a six years
Rahul kool met Ajit Pawar after a six years

केडगाव (जि. पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्यात आज (ता. 15 ऑक्‍टोबर) मंत्रालयात झालेल्या बैठकीची तालुक्‍याला उत्सुकता आहे. तालुक्‍यातील कामाच्या निमित्ताने सुमारे सहा वर्षांनंतर (फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या शपथविधीवेळी स्वागत भेट झाली होती) झालेली भेट ही चर्चेचा विषय झाली आहे. 

दरम्यान, कुल यांनी मागणी केलेले बहुतांश विषय अजित पवार यांनी मार्गी लावल्याने कुल यांनी समाधान व्यक्त केले आहे. कुल यांनी तोंडी सांगितलेले विषयांवर सुद्धा अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. 

आमदार राहुल कुल यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी तालुक्‍यातील प्रश्‍नासंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती. पवार यांनी आज वेळ दिल्याने ही बैठक मंत्रालयात पार पडली. अजित पवार आणि राहुल कुल यांची राजकीय भूमिका वेगळी असली तरी मुळशी धरणातील पाणी पुणे जिल्ह्याला मिळविण्यासाठी दोघेही प्रचंड आग्रही आहेत. 

मंत्रालयात झालेल्या बैठकीत कुल यांनी विकास कामांबाबत चर्चा झाल्यानंतर मुळशीच्या पाण्याचा विषय काढला. त्यानंतर पवार यांनी यासंदर्भात उद्या शुक्रवारी (ता. 16 ऑक्‍टोबर) वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पुण्यात बैठकीचे आयोजन केले आहे. 

अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीबाबत कुल म्हणाले की, उपमुख्यमंत्री हे आपले पालकमंत्री असल्याने विकास कामांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. मी तोंडी सांगितलेली कामेही त्यांनी मार्गी लावली आहेत. तालुक्‍यातील प्रश्नांबाबत उद्या पुन्हा पुण्यात बैठक बोलविण्यात आली आहे. 

नवीन मुठा उजवा कालवा, बेबी कालवा, भिगवण शाखा कालवा, यांची दुरवस्था झाल्याने त्यांच्या अस्तरीकरणाची मागणी केली आहे. खडकवासला पाटबंधारे विभागात गेल्या अनेक वर्षांत रिक्त झालेली पदे भरलेली नाहीत. पाणी वितरण करताना ही मोठी अडचण होत असल्याने ही पदे तातडीने भरली जावीत, दौंड येथील उपजिल्हा रग्णालयाचे श्रेणी वर्धन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील 33 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला असतानाही रुग्णालयाचे विस्तारीकरणाचे काम सुरू झाले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे काम तातडीने होणे गरजेचे आहे. 

क्रीडा संकुल व मंजूर झालेले प्रांत कार्यालय तातडीने सुरू करावे, दौंड येथे नवीन जिल्हा न्यायालय सुरू करण्याच्या मागणीचा विचार व्हावा. या मागण्या करण्यात आल्या आहेत. माझ्या मागण्यांची दखल घेऊन संबंधित विभागाद्वारे कार्यवाहीचे आश्वासन पालकमंत्री पवार यांनी दिले आहेत. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com