पुरंदर राष्ट्रवादी कॅाग्रेसचे उपाध्यक्ष विठ्ठलआप्पा झेंडे यांचे निधन  - Purandar NCP Vice President Vitthalappa Zende passes away | Politics Marathi News - Sarkarnama

पुरंदर राष्ट्रवादी कॅाग्रेसचे उपाध्यक्ष विठ्ठलआप्पा झेंडे यांचे निधन 

श्रीकृष्ण नेवसे
सोमवार, 19 एप्रिल 2021

पुरंदर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विठ्ठल सदाशिव उर्फ विठ्ठलआप्पा झेंडे यांचे  आज निधन झाले.

सासवड : पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आणि उद्योजक विठ्ठल सदाशिव उर्फ विठ्ठलआप्पा झेंडे (वय 54) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले.  त्यांच्यामागे मागे पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संभाजीराव झेंडे यांचे ते कनिष्ठ बंधू होत.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कै. सदाआण्णा झेंडे यांचे ते कनिष्ठ चिरंजीव तर.. निवृत्त सनदी अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संभाजीराव झेंडे यांचे ते कनिष्ठ बंधू होत.विठ्ठलआप्पा झेंडे यांना काही दिवसापूर्वी  पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

उपचार सुरू असतानाच  रुग्णालयातच ह्रदय विकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मालवली. नऊ वर्षांपूर्वी विठ्ठलआप्पा झेंडे यांनी दिवे गराडे गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असूनही लँड डेव्हलपर व बिल्डर म्हणून नावलौकीक मिळवला होता. सामाजिक व राजकीय क्षेत्रात ते सक्रीय होते.
 
पुरंदर राष्ट्रवादीने दोन 'आप्पा' गमावले !
दोन आठवड्यांपूर्वीच पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शिवाजीआप्पा पोमण यांचे असेच अल्पशा आजाराने निधन झाले आणि आता राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठलआप्पा झेंडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे दोन आठवड्यात राष्ट्रवादीने दोन 'आप्पा' गमावले !

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख