पुण्यात आमदाराच्या घरावर पोलिसांचे छापे : दोन अलिशान मोटारी केल्या जप्त - punr police raids mla house for bank fraud | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यात आमदाराच्या घरावर पोलिसांचे छापे : दोन अलिशान मोटारी केल्या जप्त

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

हा आमदार बॅंक घोटाळ्याशी संबंधित आहे. 

पुणे :  पुणे शहरातील एका बहुचर्चित आमदाराच्या घरावर पोलिसांनी छापे टाकले आहेत. याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळाली नसून एका सहकारी बॅंकेसंदर्भातील घोटाळ्याबाबत हे छापे असल्याचे सांगण्यात आले. यावर पोलिस लवकरच अधिकृत माहिती देतील, असे स्पष्ट करण्यात आले.

सहकारी बॅंकेतील घोटाळ्यासंदर्भात या आमदारावर कायदेशीर कारवाई झाली आहे. तब्बल 72 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीस जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार आहेत. हे छापे संपत्ती जप्त करण्यासाठी झाली की प्रकरणाच्या तपासासाठी झाले, हे समजू शकले नाही. संबंधित आमदाराच्या गाड्या, किमती वस्तू यावर जप्ती आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही जणांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. यात पुणे जिल्हा परिषदेचा माजी पदाधिकारी असलेल्या नेत्याचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.  

या बँकेचे रिझर्व्ह बँकेने 2018-19 चे आॅडीट करण्याचे आदेश दिले होते. त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी आढळले होते. त्यानंतर या बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख