आमदारांच्या प्लाझ्मा दानाचे आयएएस अधिकाऱ्यास कौतुक !  (व्हिडिओ)

चर्चेतून आयुष प्रसाद यांना सुखद धक्का बसतो.
Pune ZP CEO Ayush Prasad took a bite from MLA Rahul Kul about plasma donation
Pune ZP CEO Ayush Prasad took a bite from MLA Rahul Kul about plasma donation

केडगाव (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची पुण्यात ससून रुग्णालयाच्या आवारात रस्त्यावर भेट होते. त्या वेळी साहजिकच दोघांमध्ये कोरोनावर चर्चा होते. 

चर्चेतून आयुष प्रसाद यांना सुखद धक्का बसतो. त्यानंतर प्लाझ्मा दान केल्याबद्दल कुल यांचे अभिनंदन करत प्रसाद हे कुल यांना बाईट मागतात. एक आयएएस अधिकारी पुण्यातील रस्त्यावर एका आमदारांना बाईट देण्यासाठी विनंती करतात. हा तर आमदार कुल यांनाही अनपेक्षित धक्का होता. 

त्या वेळी कुल हे प्रसाद यांना म्हणाले की, ....पण बाईट कोण शूट करणार? त्यावर प्रसाद म्हणाले की मी स्वतः करतो शूट... प्रसाद यांनी स्वतःचा मोबाईल काढला ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कुल प्रसाद यांना प्लाझ्मा डोनेशनवर बाईट देतात. प्रसाद यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवर कुल यांचा बाइट अपलोड केला आहे त्यातून त्यांनी प्लाझ्मा दानासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. 

राज्यात आणि पुण्यात रक्त आणि प्लाझ्माचा तुटवडा आहे. प्लाझ्मा व रक्त मिळवताना रुग्णांच्या नातेवाइकांची ससेहोलपट होत असल्याच्या बातम्या आपण वाचत आहोत. रुग्णांची संख्या व प्लाझ्माचा पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त आहे. आमदार कुल यांनाही या चक्रातून जावे लागले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर आमदार कुल यांनी दोन महिन्यांनी ससून रुग्णालयामध्ये जाऊन प्लाझ्मा दान केले आहे. अशा परिस्थितीत आमदारांच्या या कृतीचे प्रसाद यांना कौतुक वाटल्याने त्यांनी हा बाइट घेतला. 

आयुष प्रसाद हे कोरोना विषाणूच्या साथीवर मात करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवत आहेत. याबाबत प्रसाद यांचे जनजागृतीचा हा छोटासा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे. सोशल मीडियावर या दोघांचे कौतुक होत आहे. एकूणच दोघांची कृती प्लाझ्मा दानला बळकटी देणारी आहे. आमदार राहुल कुल यांनी आज (ता. 29 सप्टेंबर) "सरकारनामा'ला हा प्रसंग सांगितला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com