'हनीट्रॅप' लावून आमदार मोहितेंना बदनाम करण्याचा हा डाव : निर्मला पानसरे 

डॉ.शैलेश मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी निर्मला पानसरे यांनी केली आहे.
Sarkarnama Banner (96).jpg
Sarkarnama Banner (96).jpg

राजगुरुनगर (पुणे) : ''राजकारण केले पाहिजे मात्र ते बदनामीचे करू नका. कोरोनाच्या काळात पक्षाचे पदाधिकारी जनतेसाठी मदतीला पुढे धावत असताना दुसरीकडे पक्षातील पदाधिकारी पक्षातील आमदारांवर 'हनीट्रॅप' सारख्या चुकीच्या गोष्टी करून बदनाम करण्यासाठी पुढे येत असतात ही बाब निषेधार्थ व समाजाला घातक आहे, असे कृत्य करणाऱ्याना कडक शिक्षा व्हावी,'' असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी मांडले राजगुरुनगर येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर "हनीट्रॅप" लावून त्यांची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय युवक सरचिटणीस डॉ शैलेश मोहिते पाटील, राहुल कांडगे, सोमनाथ शेंडगे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी करून पक्षाचे पदाधिकारी डॉ.  शैलेश मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे.

राजगुरूनगर येथे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कैलास सांडभोर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, जिप माजी सदस्य अरुण चांभारे, अँड सुखदेव पानसरे, खेड वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अँड अरुण मुळूक हे उपस्थित होते.

          
डॉ. शैलेश मोहिते पाटील, राहुल कांडगे, सोमनाथ शेंडगे  या तिघांनी  सातारा येथील एका युवतीला हताशी धरून खेडचे आमदार दिलीप मोहितेपाटील यांची बदनामी करण्यासाठी व खंडणी वसूल करण्यासाठी "हनीट्रॅप" लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी साताऱ्यातील संबंधित युवतीला या कामासाठी पैसे दिले, पुण्यात फ्लॅट घेऊन देण्याचे अमिश दाखविले. मात्र संबंधित युवतीने असे हनी ट्रँप करण्यास नंतर विरोध करून याबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे मयूर मोहितेपाटील यांना संपर्क करून संबंधित घटना सांगितली. मयूर मोहिते यांनी संबंधित युवतीची भेट घेऊन सातारा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार सातारा पोलिसांनी डॉ शैलेश मोहिते, राहुल कांडगे, सोमनाथ शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन सोमनाथ शेंडगे याला सातारा पोलीसांनी अटक केली तर डॉ शैलेश मोहिते, राहुल कांडगे फरार आहेत

 खेडचे आमदार दिलीप मोहितेपाटील यांच्या विरोधात चाकण येथील एका महिलेला पुढे करुन असाच प्रकार याच टोळीने केला होता तो ट्रँप अयशस्वी झाल्याने नव्याने प्लान करुन आमदार मोहितेपाटलांना एडकविण्याचा डाव करण्यात आला मात्र संबधित युवतीला हा प्रकार मान्य न झाल्याने मोहितेपाटील कुटुंबात माहिती दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या बाबत खालच्या पातळीवर जाऊन पक्षातील पदाधिकारी शैलेश मोहिते पाटील हे व त्यांचे साथीदार राहुल कांडगे, सोमनाथ शेंडगे हे कट कारस्थाने करून बदनामी करीत आहेत. त्यांच्यावर कडक करावी करावी. पक्षाचे पदाधिकारी डॉ शैलेश मोहिते यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदी पक्षाचे नेते यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com