पुणे : पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरूणीचा गेल्या रविवारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यू की आत्महत्या याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. आज तिचा भाऊ आणि त्या भावाच्या मित्राचा जवाब नोंदविण्यात आला आहे.
'पहिल्या मजल्यावरून पडलेली पूजा चव्हाण हिने मद्यपाशन केले होते, या दोघांनी दिला आहे,' अशी माहिती वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी दिली आहे. त्यामुळे पूजाच्या मृत्यूबाबत पुन्हा निराळ्या शंका सुरू झाल्या असून तिनं दारू पिली होती की तिला दारू पाजण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पूजाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालात डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाल्याने पूजाचा मृत्यू झाला असल्याचे म्हटलं आहे.
एका मंत्र्याशी या मृत्यूचा संबंध जोडला जात असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी या संबंधातील आँडिओ क्लिप पोलिस महासंचालकांकडेही दिल्या आहेत. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव आहे की काय, असा संशय विरोधी पक्षनेते व्यक्त करत आहेत.
टिकटाँक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूच्या कारणांचा तपास पोलिसांनी सुरू केला असून तिचा मृत्य म्हणजे आत्महत्याच आहे, असे नोंदविलेले नाही हे स्पष्ट करण्यात आले. तसेच तिच्या मृत्यूबाबत सोशल मीडियात व्हायरल झालेल्या आँडिओ क्लिप पोलिसांनाही मिळाल्या आहेत.
परळी येथे राहणारी पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने रविवारी रात्री पुणे येथे आत्महत्या केली. शिवसेनेच्या विदर्भातील एका मंत्र्याची ती प्रेयसी होती, अशी चर्चा त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने राज्यभर पसरली. या प्रकरणातील ऑडिओ क्लिपमध्ये मंत्री आणि अरुण राठोड नामक व्यक्तीचे संभाषण असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांचा वाद...मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसची राज्यपालांकडे धाव #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #Congress #Governor #BJP #JDU #Bihar #NItishKumar #Viral #ViralNewshttps://t.co/KvLEDbPZPh
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 13, 2021
‘...तर मला आता जीव द्यावा लागेल’, असे संभाषणाच्या शेवटी मंत्री म्हणाल्याचा दावा केला जात आहे. या तरुणीचा मोबाईल ताब्यात घ्या, असेही हा मंत्री संबंधिताला सांगत असल्याचे ऐकू येत आहे. मी स्वतः टेन्शनमध्ये आहे, असेही वाक्य हा मंत्री बोलत असल्याचे ऐकू येत आहे. आधीच घरचे टेन्शन आणि आता हे, असा संवाद आहे. काही बाबी मराठीत तर काही बंजारा बोलीत आहेत.
पूजाच्या आत्महत्येचे गूढ दिवसागणिक वाढत चालले आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेक तर्क मांडण्यात येत आहे. मंत्र्यासोबतच्या संबंधातून आलेल्या तणावाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलिसांनी त्यास दुजारा दिलेला नाही. सोरायसीस आजारामुळे कंटाळल्याने आत्महत्या केल्याचे तिच्या पालकांनी पोलिसांना सांगितले आहे.

