"मी भाजपमध्येच...राष्ट्रवादीत जाण्याची केवळ चर्चाच..."

"मी भाजपमध्येच आहे आणि भाजपमध्येच राहणार.." अशी भूमिका प्रदीप कंद यांनी जाहीर केली आहे.
4pk19.jpg
4pk19.jpg

पुणे : कित्येक वर्षे राष्ट्रवादीत राहून विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपमध्ये आलेले आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तम संपर्कात असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी अखेर मौन सोडले. "कार्यकर्त्यांनो काळजी करु नका, मी भाजपमध्येच आहे आणि भाजपमध्येच राहणार.." अशी भूमिका प्रदीप कंद यांनी जाहीर केली आहे. 

कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी मी राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा केवळ चर्चा आहे. भाजप पक्षश्रेष्ठी जे जबाबदारी देणार ती प्रामाणिकपणे मी पूर्ण करीत असल्याने पक्षनेतृत्व व शिरुर-हवेली भाजपा दोन्हीही माझ्या पूर्ण पाठीशी असल्याचेही कंद त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या चार दिवसांपासून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे नेते प्रदीप कंद राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चा सुरू आहे. याबाबत कंद यांनी तीन दिवसांपूर्वी खुलासा करताना राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांच्याशी बोलून खुलासा करण्याचे अजब विधान केल्याने कंदांच्या बाबतीत मोठा गदारोळ उठला होता. 

याच पार्श्वभूमीवर कंद यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. कंद यांनी सांगितले की, सोशल मीडीयावर काय चर्चा होईल, यात काहीच तथ्य नसते. मी राजकारणाला नव्हे तर समाजकारणाला नेहमी महत्व देत आलो आहे. निरपेक्षपणे शिरुर-हवेलीकरांची सेवा करणे यालाच मी जास्त महत्व देतो. विधानसभा निवडणुका तशा अजून खूप दूर आहेत. त्यावेळी भाजप पक्षश्रेष्ठी मला जी जबाबदारी देतील ते मी इनामेइतबारे पूर्ण करेन. माझे सर्व समर्थक तसेच कार्यकर्ते आणि मी ज्या पक्षात आलो आहे, त्या भाजपतील सर्व पदाधिकारी- कार्यकर्ते यांचा मी पूर्ण विश्वास प्राप्त केला आहे. जनसेवा हीच माझ्यासाठी राजकारण व समाजकारण असून त्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहील.


वावड्या उठविणे बंद करा...  
प्रदीप कंद हे जेव्हा भाजपमध्ये आले तेव्हा ते  देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे सर्व प्रमुख नेते, माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या सगळ्यांसाठी मोठी ताकद म्हणून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल वावड्या उठविणे दादांच्या विरोधकांनी आता बंद करावे. योग्य वेळी अशा वावड्याबहाद्दरांचा आम्ही समाचार घेवू. दरम्यान राष्ट्रवादीला सध्या भाजपाच्या ताकदवान नेते पदाधिका-यांना डोळा मारण्याशिवाय उद्योग राहिलेला नाही. सहकारातील निवडणुका पक्षीय पातळीवर चालत नाहीत हेही त्यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे ज्यांना-ज्यांना राष्ट्रवादी डोळा मारेल त्यांनी बिनधास्त राष्ट्रवादीत जावे, आम्हाला त्यांच्याशिवायही मतदार संघात पक्षबांधणी करता येतेय हे पक्ष सोडणारांनीही लक्षात घ्यावे, असा इशाराही यावेळी दादा पाटील फराटे यांनी विरोधकांना दिला आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com