‘बिर्याणी’ऑडिओ क्लिपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

पोलिस आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. कारवाई करण्याचे आदेश दिले आहे,
Sarkarnama Banner - 2021-07-30T143355.636.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-30T143355.636.jpg

पुणे : मोफत बिर्याणीची फर्माईश करणाऱ्या पोलिस उपायुक्तांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपची दखल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली. याप्रकरणी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

''मी या प्रकरणाची ऑडिओ क्लिप ऐकली असून हे प्रकरण गंभीर आहे. त्यावर पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहे,'' असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, या ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार करण्यात आले असून याप्रकरणी मी सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल करणार असल्याचे या पोलिस उपायुक्तांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

''नाहीतर रेल भरो आंदोलन करावे लागेल'' मनसेचा सरकारला इशारा
एका महिला पोलिस Pune Police अधिकाऱ्याला पुण्यातील प्रसिद्ध हाँटेलची बिर्याणी Biryani मोफत हवी आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याशी केलेले फोनवरील संभाषण सध्या खूप व्हायरल होत आहे. पुण्यातील पोलिस आयुक्त DCP असलेल्या या अधिकाऱ्यांच्या अशा कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्याने त्यांची तक्रार थेट पोलिस महासंचालकाकडे केली आहे. त्या कर्मचाऱ्याने याबाबतचे पत्र आणि ती मोफत बिर्याणीची मॅडमची फर्माईशची आँडिओ क्लिप audio clipपोलिस महासंचालकांना पाठविली आहे.  
शिवसेना शाखाप्रमुखाकडून डिलिव्हरी बॉयला मारहाण  
पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम  त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप पाच मिनिटांची आहे. यात मॅडम त्या कर्मचाऱ्याला पुण्यातील नाँनव्हेज पदार्थ कुठे चांगले मिळतात, याबाबत विचारत  आहेत. 'आपण यापूर्वी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणतो,' असे त्या कर्मचाऱ्यांने पोलिस उपायुक्त मॅडमला सांगितले. त्यावर मॅडम म्हणतात की, आपल्या हद्दीत पोलिसांनी हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा प्रश्न  केला आहे. 
 
तर मॅडमच्या पतीना मटण बिर्याणी आवडते तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलिस निरीक्षकाकडे तक्रार करा, असंही त्या  मॅडम आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहे. 'तुम्ही सांगणार की बोलू' असेही त्या कर्मचाऱ्याला म्हणाल्या. अखेर मॅडमच्या या कारभाराला त्रस्त होऊन त्या कर्मचाऱ्याने महासंचालकाकडे दाद मागितली आहे. आता पोलिस महासंचालक या पोलिस उपायुक्त मॅडमवर कारवाई करतील का, हे लवकरच कळेल 

Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com