ह्दयद्रावक : आँक्सिजन बेड शोधता शोधता रुग्णवाहिकेतच मुलासमोरच आईचा दुदैवी मृत्यु.. - pune Oxygen Mother dies in front of child in ambulance | Politics Marathi News - Sarkarnama

ह्दयद्रावक : आँक्सिजन बेड शोधता शोधता रुग्णवाहिकेतच मुलासमोरच आईचा दुदैवी मृत्यु..

किरण भदे 
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

स्वतःच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यु पाहण्याची वेळ मुलावर आली.

नसरापूर : आईची तब्बेत मात्र खालावत चाललेली अशा अवस्थेत एका रुग्णवाहीकेत एक आँक्सिजन सिलेंडर घेवून पुणे पिंपरीच्या कानोकोपऱ्यातील रुग्णालयात फिरुन बेडचा शोध घेतला परंतु कुठेच आँक्सिजन बेड मिळाला नाही, तो पर्यंत रुग्णवाहिकेत घेतलेला आँक्सिजन संपत आला होता व अखेर संपला स्वतःच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यु पाहण्याची वेळ मुलावर आली.

नसरापूर येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माजी ग्राम पंचायत सदस्य सुधीर शेडगे यांच्या आई सावित्रा वामन शेडगे( वय 70 ) यांचा मृत्यु झाला. दोन ते तिन दिवस त्यांची तब्बेत बरी नव्हती म्हणून नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालु होते मात्र, कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट ता. 21 रोजी पाँझिटिव्ह आला. आँक्सिजन पातळी देखिल 75 पर्यंत खाली आल्याने आँक्सिजन बेडची आवश्यकता निर्माण झाली. 

सुधीर शेडगे यांनी तातडीने नसरापूर मधील दोन्ही खासगी रुग्णालयात बेडची चौकशी केली, परंतु दोन्ही रुग्णालयात आँक्सिजन बेड शिल्लक नव्हते. भोर तालुक्यासह परिसरात व सातारा जिल्ह्यात देखिल बेड मिळत नव्हता पुण्यात ओळखीच्या माध्यमातून ठिकठिकाणी फोन करुन चौकशी केली जात होती, मात्र बेड मिळत नव्हता. कोवीड सेंटरचे फोन लागत नव्हते. शेवटी नसरापूर येथील सुर्यवंशी हाँस्पिटल मध्ये विनंती करुन एक आँक्सिजन सिलेंडर घेऊन सिध्दिविनायक हाँस्पिटलची रुग्णवाहिका घेऊन त्या मध्ये सावित्रा यांना आँक्सिजन लावून बेड शोधण्यासाठी पुण्यात नेण्यात आले. 

दिलेला आँक्सिजन सिलेंडर चार तासच चालणार होता, त्यावेळेत पुण्यातील अनेक रुग्णालयात जाऊन बेड ची मागणी करण्यात आली परंतु बेड मिळाला नाही. सुधीर शेडगे यांच्या समवेत त्यांचे चुलत बंधु रविद्र शेडगे पुतणे विश्वजीत सत्यजीत व केदार यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली, परंतु कुठेही बेड मिळु शकला नाही तो पर्यंत आँक्सिजन संपत आलेला होता या धावपळीतच शेवटी आँक्सिजन संपला सावित्रा यांना जोरची धाप लागली व त्यांची प्राणज्योत मालवली. 

आईसाठी केलेल्या अथक प्रयत्न अपुरे पडले हे पाहुन मुलाच्या भावनांचा बांध फुटला होता. डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार शेवटी ससून रुग्णालयात आईचे पार्थीव नेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली व पुणे येथेच अत्यंसंस्कार करण्यात आले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख