धक्कादायक : पुण्यात पोलिस अधिकाऱ्याच्या आईचा डोक्यात रॉड घालून खून - Pune Murder of police sub inspector mother | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : पुण्यात पोलिस अधिकाऱ्याच्या आईचा डोक्यात रॉड घालून खून

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 मे 2021

शाबाई शेलार यांचे पुत्र विठ्ठल अरुण शेलार हे सातारा पोलिस दलात सहायक पोलिस निरीक्षक (API) म्हणून कार्यरत आहेत.

पुणे : पोलिस अधिकाऱ्याच्या आईच्या डोक्यात रॅाड घालून खून Murder केल्याची घटना आज पुण्यात घडली. या घटनेमुळे वारजे माळवाडी Warje Malwadiपरिसरात काही काळ तणाव होता. पोलिस घटनास्थळी पोहचले असून तपासाला सुरवात झाली आहे.  Pune Murder of police sub inspector mother

पोलिस घटनास्थळी पोचले, त्यावेळी महिलेच्या डोक्यात डोक्यात लोखंडी सळई घालून खून करण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविला. 

सातारा येथे सहायक पोलिस निरीक्षकाच्या आईच्या डोक्यात रॉडने मारुन खून केल्याची घटना वारजे माळवाडी येथे घडली आहे. शाबाई अरुण शेलार (वय ६५, रा. रामनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वारजे माळवाडी येथील रामनगर भाजी मंडई जवळ आज पहाटे चार वाजता ही घटना घडली आहे़.

संभाव्य तिस-या  लाटेचा धोका टाळण्यासाठी मुलांसाठी स्वतंत्र्य रुग्णालय
 
शाबाई शेलार यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय होता. भाजी मंडईजवळच त्यांचे दुकान असून त्या तेथेच रहात होत्या. भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या एकाने हा प्रकार पाहून पहाटे साडेपाच वाजता वारजे पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपासाला सुरुवात झाली आहे. 

शाबाई शेलार यांचे पुत्र विठ्ठल अरुण शेलार हे सातारा पोलिस दलात सहायक पोलिस निरीक्षक (API) म्हणून कार्यरत आहेत. पोलिस अधिकाऱ्याची आई अशी ओळख शाबाई शेलार यांची होती, मग त्यांचा खून कुणी व कशासाठी केला, असा प्रश्न निर्माण झाला असून वारजे पोलिस तपास करीत आहेत.  या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच रामनगर येथे मोठा जमाव जमला होता. परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. या घटनेनंतर तेथे वादावादी झाली असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख