पुणे महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षापासून

हे महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येणार आहे.
pune muncipal corporation starts sepatare   medical college from next year
pune muncipal corporation starts sepatare medical college from next year

पुणे : पुणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य सरकारने आज मंजुरी दिली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ स्थायीचे समितीचे अध्यक्ष असताना दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या अर्थसंकल्पात महाविद्यालय सुरू करण्याची कल्पना मांडून त्यासाठी अर्थिक तरतूद करण्यात आली होती.

हे महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १० एकर जागा राखीव करण्यात आली आहे. महापौर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री-पालकमंत्री अजित पवार तसेच नगरविकास विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक यांच्याकडे व्यक्तिशः पाठपुरावा केला होता. महाविद्यालय राज्य सरकारच्यावतीने सुरू करण्यात यावे, असा सरकारचा प्रस्ताव होता. मात्र, महापौर मोहोळ यांनी महापालिका खर्च उचलण्यास सक्षम असल्याचे सांगून महापालिकेच्यावतीने ट्रस्ट स्थापन करून महाविद्यालय सुरू करण्याचासुरवातीपासून आग्रह धरला होता.

या संदर्भात महापौर मोहोळ म्हणाले, 'सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत अहमदाबाद महापालिकेने साकारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. या संदर्भातील तांत्रिक बाबींची पूर्तता करत वेगाने पाठपुरावा केला. आणखी काही तांत्रिक मान्यता घेऊन पुढील वर्षीच्या जूनमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ५०० खाटा असणारे सुसज्ज आणि अद्ययावत महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे.’’

५९५ पदांची निर्मिती आणि ६२२ कोटींची गरज
महाविद्यालय सुरू करण्यासाठी ५९५ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. येत्या सहा वर्षात टप्प्याटप्प्यात ६२२ कोटी रुपयांची आवश्यकता भासेल, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com