महापौर मोहोळांची पुणेकरांसाठी धडपड; बंद २१ व्हेंटिलेटर दुरुस्त करून दिले रुग्णांसाठी

ते​व्हेंटीलेटर महापालिकेच्या ताब्यात घेतले होते.
Pune Mayor Murlidhar Mohol repaired 21 ventilators to hospitals
Pune Mayor Murlidhar Mohol repaired 21 ventilators to hospitals

पुणे  ः पीएम केअर्सच्या माध्यमातून गेल्या वर्षी ससून रुग्णालयाला मिळालेल्या व्हेंटिलेटरपैकी २५ व्हेंटिलेटर बंद होती. ते व्हेंटिलेटर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी   महापालिकेच्या ताब्यात घेतले होते, त्यातील २५ पैकी २१ व्हेंटिलेटर सुरु करण्यात आले आहेत. त्याचा वापर महापालिकेची रुग्णालये आणि ससूनमध्ये करण्यात येणार आहे. महापौर मोहोळ यांनी वेळीच तातडीने पाऊल उचलत ही २१ व्हेंटिलेटर दुरुस्त केल्याने सध्याच्या आणीबाणीच्या काळात रुग्णसेवेसाठी उपलब्ध झाली आहेत. 

पुण्याला पीएम केअर्सच्या माध्यामातून मिळालेल्या व्हेंटिलेटरपैकी ८० पेक्षा जास्त व्हेंटिलेटर ससूनला देण्यात आलेले होते. त्यातील ३४ व्हेंटिलेटर किरकोळ कारणांसाठी बंद ठेवले होते. याबाबतची चर्चा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थित झालेल्या कोरोना आढावाच्या बैठकीत झाली होती. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याशी तातडीने संपर्क साधला आणि ती व्हेंटीलेटर महापालिकेच्या ताब्यात घेतली होती. विशेष तंत्रज्ञाच्या सहाय्याने ही व्हेंटिलेटर दुरुस्त करण्यात आली आहेत.

पुणे शहरातील रुग्णांना महापालिकेच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, ससून रुग्णालयातील काही व्हेंटिलेटर बंद असल्याची माहिती एका बैठकीत पुढे आली होती. त्यानंतर ससूनच्या अधिष्ठातांशी संपर्क साधून ती व्हेंटीलेटर महापालिका प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर आठवडाभरात ती दुरुस्त करण्यात आली आहेत. सध्याच्या आणीबाणीच्या काळात किरकोळ कारणांसाठी ही व्हेंटीलेटर बंद ठेवणे परवडण्याजोगे नव्हते, त्यामुळे पुढाकार घेऊन ती तातडीने सुरू करण्याचा प्रयत्न केला, असे पुण्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

दरम्यान, दुरुस्त करण्यात आलेल्या २१ व्हेंटिलेटरपैकी ८ व्हेंटिलेटर बिबबेवाडी येथील रुग्णालयात रुग्णांसाठी वापरण्यास सुरूवात करण्यात आली आहेत. उर्वरीत व्हेंटिलेटर ही महानगरपालिकेची रुग्णालये आणि ससूनमध्ये लावण्यात येणार आहेत. ही २१ व्हेंटिलेटर सुरू झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे,  असेही महापौरांनी नमूद केले.

पुण्याला पीएम केअर्सच्या माध्यमातून नवे तीस व्हेंटिलेटर

'पीएम केअर्स'च्या माध्यमातून पुणे महापालिकेस ३० व्हेंटीलेटर मिळाले आहेत. त्याचा फायदा पुण्यातील रुग्णांना आणि वैद्यकीय यंत्रणेला होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्याला व्हेंटीलेटर देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यास पहिल्या टप्प्यात हे ३० व्हेंटीलेटर मिळाले आहेत. दरम्यान, शंकर महाराज मठ यांच्या माध्यमातून ५ व्हेंटिलेटर महानगरपालिकेला मिळाले आहेत, असेही मोहोळ यांनी या वेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com