Pune Mayor Murlidhar Mohol gets discharge | Sarkarnama

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना मिळाला डिस्चार्ज 

विजय दुधाळे 
गुरुवार, 9 जुलै 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेणारे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना गुरुवारी (ता. 9 जुलै) डिस्जार्च देण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वतः महापौर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे. 

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेणारे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना गुरुवारी (ता. 9 जुलै) डिस्जार्च देण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वतः महापौर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे. 

कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने रुग्णालयाने त्यांना घरी सोडले आहे. परंतु आगामी सहा दिवस म्हणजे 15 जुलैपर्यंत त्यांना होम क्वारंटाइन राहण्यास डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले आहे. 

कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे महापौर मोहोळ यांना 4 जुलै रोजी मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही चाचणी करण्यात आली होती. त्यात कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून उघड झाले होते. कुटुंबांतील काही जणांवर रुग्णालयात, तर काहींवर घरीच उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, महापौर मोहोळ यांना कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. मात्र त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजपर्यंत त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे न दिसल्याने डॉक्‍टरांनी त्यांना डिस्जार्च देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांना येत्या 15 तारखेपर्यंत होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले आहे, याबाबतची माहिती मोहोळ यांनी ट्‌विट करून दिली आहे. 

ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, "कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे मला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. होम क्वारंटाइन राहण्याची सूचना देण्यात आली आहे. माझ्यावर उपचार करणारे डॉक्‍टर आणि तेथील कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. होम क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर मी आपल्यासाठी 24 तास उपलब्ध असेन, याचं नक्कीच समाधान आहे,' असे मोहोळ यांनी सांगितले आहे. 

भावाला कोरोना, पण खासदारांसह कुटुंबाचा अहवाल निगेटीव्ह..

 औरंगाबाद  :   एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या भावाचा कोरोना अहवाल दोन दिवसांपुर्वी पॉझीटीव्ह आला होता. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी स्वतःसह कुटुंबियांचे स्वॅब देखील तपासणीसाठी दिले होते. परंतु सुदैवाने सगळ्याचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तुमच्या सगळ्यांचे आशिर्वाद आणि सदिच्छामुळे माझ्यासह कुटुंबातील इतर सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तुम्ही सुध्दा काळजी घ्या, लक्षणे दिसताच तपासणी करुन घ्या, असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

शहरात १० ते १८ जुलै दरम्यान, कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. परंतु या महत्वाच्या बैठकीला खासदार इम्तियाज जलील गैरहजर राहिल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यांचा लॉकडाऊनला विरोध असल्यामुळेच त्यांनी बैठकीला दांडी मारली असेही बोलले गेले. पण बैठकी पुर्वीच इम्तियाज यांनी विभागीय आयुक्तांना फोनवरून तुम्ही जो निर्णय घ्याल त्यास माझा पाठिंबा असेल अशी भूमिका मांडली होती असेही समजते. गेल्या काही दिवसांपासून ते सोशल मिडियावरही ॲक्टीव्ह नसल्यामुळे अनेकांना प्रश्न पडला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख