निर्बंध 'जैसे थे'च ; पुणेकरांना दिलासा नाहीच! - pune lockdown ajit pawar extended restrictions weekend lockdown in pmc decided | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

निर्बंध 'जैसे थे'च ; पुणेकरांना दिलासा नाहीच!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

पुणे :  राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे पुणे शहर पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात काही भागात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच कायम ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar, यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. pune lockdown ajit pawar extended restrictions weekend lockdown in pmc decided

''पुणे शहर पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात काही भागात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच कायम ठेवण्यात आले आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत दुकाने उघडता येतील. शनिवार, रविवारी वीकेंडला अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद राहतील, '' असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, "कोरोनाबाधित रुग्णांचे गृह विलगीकरण न करता संस्थात्मक विलगीकरण झाले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. ज्यांच्या घरात स्वतंत्र खोल्या, बाथरूम नाहीत, त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे. उद्योगांनी कामगारांना लसीचे दोन्ही डोस देऊन उद्योग सुरू करावेत. एका हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केली. परंतु कुणी आत्महत्या करावी असे सरकारला वाटते का ? अलीकडच्या काळात आत्महत्या झाली की त्याला सरकारला जबाबदार धरले जाते. नेमके कारण पण बघितले पाहिजे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यास निर्बंध शिथिल करण्यात येतील."

पुण्यातील नियोजित विमानतळाबाबत अजित पवार म्हणाले की, आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी पुरंदर तालुक्यात जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर विमानतळासाठी अन्य ठिकाणी जागेचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. परंतु विमानतळाबाबत अद्याप जागा निश्चित झालेली नाही.  
 
सध्या मॉल बंद आहेत याबाबत पवार म्हणाले, ''मॉलमध्ये एखादा व्यक्ती काही खरेदी करायला गेल्यास तो सर्वत्र फिरतो. त्यामुळे मॉल सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मॉलमध्ये प्रवेश देता येईल का, याबाबत विचार करण्यात येईल."  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी बकरी ईदबाबत गतवर्षी जे धोरण होते, त्यानुसार निर्बंध यावर्षीही कायम राहतील, असेही पवार म्हणाले. 

अजितदादांच्या मिश्किल टिपण्णीमुळे उपस्थितांना हसू आवरता आले नाही!
पुणे : पुणे महापालिकेने  Pune Municipal Corporation बाणेर परिसरात पाच मजली कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar हे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आले होते. यावेळी अजित पवारांची केलेल्या मिश्किल टिपण्णीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख