#पुणे पदवीधर मतदारसंघ : महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची खलबतं  सुरू.. - Pune Graduate Constituency Meeting of senior leaders of Mahavikas Aghadi begins | Politics Marathi News - Sarkarnama

  #पुणे पदवीधर मतदारसंघ : महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची खलबतं  सुरू..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज दुपारी बारा वाजता पुण्यातील काँग्रेस भवनात सुरू झाली आहे.

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आज महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज दुपारी बारा वाजता पुण्यातील काँग्रेस भवनात सुरू झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, सतेज पाटील, शिवसेनेचे नेते रमेश कोंढे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी रणनिती आखली जात आहे.

राज्यातल्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तपणे प्रसिद्धपत्रक जारी करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत.

या प्रसिद्धीपत्रकात महाविकास आघाडीच्या नेत्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
यामुळे महाविकास आघाडीने उमेदवाराच्या नावाबाबत पडदा टाकलेला दिसतो. 

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार :

1) अमरावती शिक्षक मतदारसंघ - श्रीकांत देशपांडे (शिवसेना)
2) पुणे शिक्षक मतदारसंघ - जयंत आसगांवकर (काँग्रेस) 
3) पुणे पदवीधर मतदारसंघ - अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
4) औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) 
5) नागपूर पदवीधर मतदारसंघ - अभिजित वंजारी (काँग्रेस) 

अशी रंगणार लढत

नागपूर पदवीधर मतदारसंघातील लढत
 - अभिजित वंजारी (काँग्रेस), संदीप जोशी (भाजप), राहुल वानखेडे (वंचित), नितीन रोंघे (विदर्भवादी उमेदवार)

औरंगाबादमध्ये पदवीधर मतदारसंघातील लढत 
शिरीष बोराळकर (भाजप), प्रवीण घुगे (भाजप बंडखोर), रमेश पोकळे (भाजप बंडखोर), नागोराव पांचाळ (वंचित), सतीश चव्हाण (राष्ट्रवादी),ईश्वर मुंडे (राष्ट्रवादी)

अमरावती शिक्षक पदवीधर मतदार संघातील लढत
श्रीकांत देशपांडे (शिवसेना), नितीन धांडे, दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती), संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समितीकडून (भाजपा माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची बहीण), प्रकाश काळबांडे (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ )

पुणे शिक्षक मतदारसंघातील लढत 
जयंत आसगावकर (काँग्रेस), उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ)  

 (Edited  by : Mangesh Mahale)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख