शिरुरच्या भावी ७१ सरपंचांची कोंडी सुटली... - pune Election of Sarpanches of 71 villages in Shirur taluka announced | Politics Marathi News - Sarkarnama

शिरुरच्या भावी ७१ सरपंचांची कोंडी सुटली...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

शिरुर तालुक्यातील सरपंचांची निवडणूक २४ व २५ तारखेला होणार आहे. 

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील ७१ भावी सरपंचांच्या चेह-यावरील चिंतेची लकेर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांनी एका आदेशाने दूर केली. शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाच्या याचिकेमुळे तब्बल १५ दिवस लांबलेली ही निवडणूक आता येत्या २४ व २५ तारखेला होणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी जाहीर केले आहे. 

जिल्ह्यातील ७४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील अनुसुचित जाती-जमाती सरपंच आरक्षणावर आक्षेप घेतल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आणि संपूर्ण शिरुर तालुक्यातील सरपंच निवडी ता.९ व ता.१० ऐवजी पुढे ढकलून शिक्रापूरच्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून नव्याने निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. याबाबतची सुनावणी ता. १० रोजी झाली. या सुनावणीनंतरचा निकाल जिल्हाधिका-यांनी ता. १६ रोजी जाहीर करीत याचिकाकर्त्यांचे म्हणणे फेटाळले. 

दरम्यान या निर्णयानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी शिरुरच्या सर्व ७१ सरपंचांच्या निवडीच्या तारखा अनुक्रमे ता. २४ (३६ सरपंच निवड) व ता. २५ (३५ सरपंच निवड) तारखेला सर्व निवड होईल, असे  जाहीर केले आहे. शिक्रापूरचे आरक्षण कायम ठेवण्याचाही निर्णय जाहीर केला.  

ता.२४ ( ३६ सरपंचांची  निवड) : निमगाव दुडे, रावडेवाडी, बाभूळसर बुद्रुक, विठ्ठलवाडी, दहीवडी, नागरगाव, न्हावरा, आंधळगाव, तळेगाव-ढमढेरे, 
पिंपळसुटी, सविंदणे, कोळगाव डोळस, जातेगाव बुद्रुक, आमदाबाद, निर्वी, कुरुळी, गुनाट, मलठण, आलेगाव-पागा, चिंचोली-मोराची, कवठे यमाई, 
वडगाव रासई, गणेगाव दुमाला, वरुडे, इनामगाव, निमगाव भोगी, चांडोह, चिंचणी, वडनेर खुर्द, शिरसगाव काटा, सादलगाव, फाकटे, पिंपरखेड, उरळगाव, निमगाव-म्हाळूंगी, शिंदोडी

ता.२५ (३५ सरपंचांची निवड) : डिंग्रजवाडी, दरेकरवाडी, बुरुंजवाडी, खैरेवाडी, जातेगाव खुर्द, पिंपळे-खालसा, वाडा पुनर्वसन, कोरेगाव-भिमा, गणेगाव-खालसा, गोलेगाव, बाभूळसर खुर्द, मिडगुलवाडी, पिंपरी-दुमाला, टाकळी-भिमा, कान्हुर-मेसाई, पिंपळे-जगताप, आपटी, पारोडी, खंडाळे, कारेगाव, करंदी, मुखई, शिक्रापूर, हिवरे, निमोणे, केंदूर, भांबर्डे, पाबळ, वाघाळे, मोटेवाडी, सणसवाडी, कोंढापूरी, वढु बुद्रुक, धामारी, खैरेनगर,

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख