पुण्याच्या उपमहापौर शेंडगे यांचा राजीनामा, नवा उपमहापौर आरपीआयचा... - Pune Deputy Mayor Shengade resign | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

पुण्याच्या उपमहापौर शेंडगे यांचा राजीनामा, नवा उपमहापौर आरपीआयचा...

अमोल कविटकर
मंगळवार, 16 मार्च 2021

आरपीआयकडून उपमहापौरपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.

पुणे : पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. आता उपमहापौरपद पुन्हा एकदा आरपीआयला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. शेंडगे यांनी सोमवारी रात्री राजीनामा पक्षाकडे दिला आहे. पक्षातील वरिष्ठांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. 

आता आरपीआयकडून उपमहापौरपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. पुणे महापालिकेत पदाधिकार्‍यांचे खांदेपालट करायला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती.

सभागृहनेते धीरज घाटे यांचा राजीनामा घेऊन त्यावर गणेश बिडकर यांना नियुक्त करण्यात आले होते. त्यासोबतच उपमहापौरपदीही नव्या व्यक्तीची निवड होणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र त्यावेळी शेंडगे यांना पक्षाकडून अभय मिळाले होते. मात्र, आरपीआयला उपमहापौरपद देण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू होऊन भाजपनने हे पद आरपीआयला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

बेळगावातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा..शिवसेनेचे आवाहन

भारतीय जनता पक्षाला २०१७ मध्ये पुणे महापालिकेत मोठे यश मिळाले होते. यात आरपीआयचे केवळ पाच नगरसेवक निवडून आले असले, तरी आरपीआयच्या मतांचा फायदा भाजपला शहरभर झाला होता. त्यामुळे अवघ्या दहा महिन्यांवर आलेल्या निवडणुकांच्या आधी भाजपने 'भाकरी फिरविण्या'चा निर्णय घेतला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख