भाजपला गोपनीय माहिती पुरविणारा काॅंग्रेसचा तो नेता कोण ?

आपल्याच पक्षाची गोपनीय माहिती देणारा तो नेता कोण?
Sarkarnama - 2021-09-13T171513.189.jpg
Sarkarnama - 2021-09-13T171513.189.jpg

पुणे : ''कॉग्रेसच्या (Congress) बैठकांमधील गोपनीय माहिती भाजपला BJP पुरविले जाते,'' असा गंभीर आरोप करणारे पत्र पक्षाच्या पुण्यातील एका नगरसेवकाने शहराध्यक्षांना पाठविले आहे. त्यानंतर आता आपल्याच पक्षाची गोपनीय माहिती देणारा तो नेता कोण? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

पुणे शहर कॉग्रेसच्या अध्यक्षांना पक्षाच्या एका नगरसेवकाने पाठविलेल्या पत्रामुळे कॉग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.  या पत्रात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉग्रेसला (NCP) सोडण्याचा प्लॅन सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षाची गोपनीय माहिती भाजपला पुरविली जात असल्याचा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला आहे. शहराध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत चार सप्टेंबरला कॉग्रेस भवनात Congress Bhavan शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी बूथ कमिट्यांची बैठक बोलविण्यात आली होती मात्र, काही कारणामुळे बागवे या बैठकीला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे ही बैठक प्रदेश कार्यकारिणीमध्ये काम करणाऱ्या शहरातील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने घेतली. या बैठकीला अनेक नगरसेवकांनी येण्याचे टाळले. या सर्व प्रकारानंतर एका नगरसेवकाने पत्र पाठविले आहे. 

रमेश बागवे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे की...
ता. 4/9/2021 रोजी सायंकाळी आपण कॉंग्रेस भवन येथे आगामी मनपा निवडणुका व बूथ कमिटी नियोजन याबाबत महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. परंतु वैयक्तिक कारणास्तव आपण बैठकी वेळी उपस्थित नव्हता. आपल्या अनुपस्थितीत काही इसमांनी बैठकीत कामकाज पुढे सुरू करण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्ती ही अंतर्गतरित्या भाजपशी जवळीक ठेवून पक्षविरोधी कृत्य केले. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरवली. संबंधित व्यक्तीच्या काँग्रेस पक्षाबद्दलची विश्वासार्हता, निष्ठाबाबत कार्यकर्तादेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. अशा व्यक्तीला आपल्या अनुपस्थितीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्याची सूत्रे देणे ही आक्षेपार्ह बाब आहे.
 
अशा बैठकीतील गोपनीय माहिती, प्रभागातील पडद्यामागील घडामोडी भाजपला कळवण्यात येतात. त्याचा उपयोग निवडणुकीवेळी विरोधी पक्ष मोर्चेबांधणीकरीता वापरतात. असा अनेकांना पुर्वानुभव आहे .काँग्रेस पक्षाच्या पुरोगामी विचारसरणीवर वर्षोनुवर्षे अल्पसंख्याक समाजाच्या मतांसाठी तुष्टीकरणाचा खोटा आरोप केला जातो. ही बाब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अन्य जातीय संघटना वर्षोनुवर्षे समाजात ठसविण्याचा प्रयत्न करत आहे.

अनेक इतर समाज पक्षापासून काही प्रमाणात दूर जात असल्याची वस्तुस्थिती आहे. गैरसमजाच्या धुक्यातून आता कुठे पक्ष सावरत असताना बेजबाबदार प्रवृत्तीला अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांची बैठकीची सूत्रे देणे गैर आहे. सदर व्यक्तीने फेसबुक व इतर सोशल मीडियावर बैठकीची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यामुळे कॉंग्रेस निवडणुकीसाठी अल्पसंख्याक समाजाला प्राधान्याने विचारात घेते. असा पक्षास हानिकारक संदेश निवडणुकीच्या तोंडावर बहुजन समाजात पसरतो. ही बाब षढ्यंत्राचा भाग असून दुर्दैवाने आपण यास बळी पडत आहात.

ज्यांनी कॉंग्रेस पक्षाचा हक्काचा परंपरागत पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे बहाल करण्याची सुपारी घेतली. प्रत्यक्ष परिस्थिती बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशांना बाजूला सारणे हे आत्यंतिक गरजेचे आहे. ज्यांच्यावर कोणत्याही सभासद अगर इच्छुक उमेदवार यांना काडीचा विश्वास नाही. अशा व्यक्तींना महत्त्वाची बैठक आयोजित करण्याची सूत्रे देऊ नयेत. आपण उपस्थित नसल्यास बैठक पुढे ढकलावी. पण, पक्षद्रोही व्यक्तींना आपण पुन्हा पुन्हा आमच्यावर लादू नका.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com