अजितदादांच्या मिश्किल टिपण्णीमुळे उपस्थितांना हसू आवरता आले नाही! - pune ajit pawar mischievous remark in tour see what happened | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

अजितदादांच्या मिश्किल टिपण्णीमुळे उपस्थितांना हसू आवरता आले नाही!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

काहींना दुध घेतल्यावर नाही तेच सुरू होत, असे अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पुणे : पुणे महापालिकेने  Pune Municipal Corporation बाणेर परिसरात पाच मजली कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar हे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आले होते. यावेळी अजित पवारांची केलेल्या मिश्किल टिपण्णीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. अजितदादांनी मिश्किल मूडमध्ये केलेल्या विधानाने उपस्थितांना हसू आवरता आले नाही.  ajit pawar mischievous remark

अजित पवार हे आज सकाळी सात वाजता कोविड सेंटरची पाहणी करण्यास येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सर्व तयारी केली होती. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, आरोग्य प्रमुख आशिष भारती आणि स्थानिक नगरसेवक बाबुराव चांदेरे आदी उपस्थित होते. 

अजित पवार यांनी पाच मजली कोविड सेंटरची पाहणी केल्यानंतर त्यांना सर्वांनी आग्रह केला की, दादा आपणास सर्व माहिती द्यायची आहे. त्यासाठी इमारती मधील तळ मजल्यावर एका केबिन चर्चा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्वासमोर चहा, बिस्किट आणि काही वेळाने दुधाचे ग्लास देखील ठेवण्यात आले. तेवढ्यात अजित पवारांनी दुध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या बाजूला असलेले नगर अभियंता प्रशांत वाघमारे दुधाचा ग्लास घेत नाही हे लक्षात येताच स्थानिक नगरसेवक बाबुराव चांदेरे म्हणाले की, साहेब दूध घ्या, त्यावर अजित पवार म्हणाले की, काहींना दुध घेतल्यावर नाही तेच सुरू होत, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर प्रशांत वाघमारे म्हणाले की, दादा अस काही नाही. मी ब्लॅक टी घेतो असं सांगितलं. त्यावर अजित पवार म्हणाले की, मला आणि आयुक्तांना सवय आहे म्हणून दूध घेतो. वाघमारे दुधाच्या ग्लासाला हात लावायला तयार नाहीत. त्यामुळे काहींना दुधाची अ‍ॅलर्जी पण असते किंवा काही जण पीत देखील नसल्याचे अजितदादांनी सांगितले.

भाजप नगरसेविकेचा बळी गेल्यानंतर पिंपरी पालिकेला आली खडबडून जाग 
पिंपरी :  आपल्या पक्षाच्या नगरसेविकेचा डेंगीने बुधवारी (ता. १४) बळी गेल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप लगेचच खडबडून जागी झाली. डेंगीच नाही, तर डासामुळे होणारा मलेरिया तसेच स्वाईन फ्लू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे फर्मान महापौर माई ढोरे यांनी काढले आहे. त्याबाबत दुर्लक्ष करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख