पुण्यात माजी आमदारासह महापालिकेचे पदाधिकारी कोरोनाने बेजार 

पुण्यात आज (ता. 6 जुलै) दिवसभरात 861 कोरोनाग्रस्तांची भर पडली, तर 630 रग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे 368 रुग्ण अत्यवस्था असून त्यांच्यावर उपाचार सुरू आहेत. व्हेंटिलेटरवर 64 रुग्ण आहेत. आज दिवसभरात 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
In Pune, 861 people tested positive for corona during the day
In Pune, 861 people tested positive for corona during the day

पुणे : पुण्यात आज (ता. 6 जुलै) दिवसभरात 861 कोरोनाग्रस्तांची भर पडली, तर 630 रग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे 368 रुग्ण अत्यवस्था असून त्यांच्यावर उपाचार सुरू आहेत. व्हेंटिलेटरवर 64 रुग्ण आहेत. आज दिवसभरात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुण्यात गेल्या तीन महिन्यांत 22 हजार 381जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 13 हजार 739 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर (ता. 6 जुलै) 730 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात सात हजार 912 जण पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. गेल्या आठ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 

गेल्या दोन दिवसांत महापालिकेतील काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापलिकेच्या कर्मचारी व आधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. काही आधिकाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून पुणेकरांच्या मदतीला धावणाऱ्या अनेक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व महापालिका कर्मचाऱ्यांना गेल्या आठ दिवसांत मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झाली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ तसेच त्यांचे कुटुंबीय, माजी महापौर वैशाली बनकर यांच्या कुटुंबातील काही जणांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. माजी आमदार व भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांना तसेच त्यांच्या चिरंजीवांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यातील सर्व जणांना लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 

आगामी काही दिवस आणीबाणीचे आहेत. काम करताना महापालिकेचे कर्मचारी तसेच महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणेकरांची काळजी घेणारी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम राहण्याची गरज आहे. या यंत्रणेत काम करणाऱ्या व्यक्तीच कोरोनाबाधित झाल्या तर कोरोना विरूद्धच्या लढाईत अडचण येईल, त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची आवश्‍यकता असल्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

मुंबईत सोमवारी 1201 नवीन रुग्ण 

मुंबई : मुंबई शहरात सोमवारी (ता. 6 जुलै) 1 हजार 201 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 85 हजार 326 इतकी झाली आहे. तसेच 39 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 4 हजार 935 वर पोचला आहे. यासोबतच 1 हजार 269 रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत. 

मुंबईत नव्याने नोंद झालेल्या 39 मृत्यूंपैकी 32 जणांना दीर्घकालीन आजार होते. यात 23 पुरुषांचा, तर 16 महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होते. 22 रुग्ण हे 60 वर्षांवरील होते, तर 15 रुग्ण हे 40 ते 60 वयाच्या दरम्यान होते. मुंबई संशयित रुग्णांचे आढळणे सुरूच असून मंगळवारी देखील 762 नवीन संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 59 हजार 181 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com