ओबीसींचा हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नका : प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

मराठा समाज केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. मराठा समाजाच्या पुढाऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी मुद्दा अधिक गुंतागुंतीचा बनवू नये, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलताना केले
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

पुणे : मराठा समाज केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. मराठा समाजाच्या पुढाऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी मुद्दा अधिक गुंतागुंतीचा बनवू नये, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलताना केले. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "आमचं ताट, आम्हालाच राहुद्या, हे ओबीसींचं म्हणणं आहे. ओबीसींना आरक्षणाची वाटणी नको आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण ओबीसीमधून नको, अशी आमची भूमीका आहे. माझे  मराठा पुढाऱ्यांना आवाहन आहे की इश्यू कॉम्प्लिकेट करु नका. ओबीसींमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नका,"

आंबेडकर पुढे म्हणाले, "मराठा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. राज्यात तो १६ टक्के असला तरी देशात मराठे २ टक्के आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं. देशातील ओबीसी एकत्र आला तर महाराष्ट्रापुरतं जे मराठा समाजाला मिळणार आहे, तेही मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने एक स्थगिती दिली, त्यावर घाबरून न जाता, फायनल हियरिंगला प्रकरण आलं तर मुंबई हायकोर्टाचा निकाल सर्वोच्च न्यायालय कायम ठेवेल आणि निकाल मराठा समाजाच्या बाजूनं लागेल,"

दरम्यान,  मराठा आरक्षणाला मंत्रीमंडळातील सहा ते सात मंत्र्यांचा विरोध आहे. या मंत्र्यांची लॅाबी यासंदर्भात सक्रीय झाली आहे. त्यामुळेच मराठा आरक्षणाच्या विषयावर गोंधळ निर्माण केला जात आहे. याविषयी सरकारने स्पष्टीकरण न केल्यास राज्य सरकारला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी नाशिक येथे आज केले.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळणं हे महाविकास आघाडी सरकारचं अपयश आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आज ही वेळ आली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिलेली आश्वासनं मुख्यमंत्री अजून पाळायला तयार नाहीत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याविषयी ते काहीही करीत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिलेला शब्द पाळायचे, मात्र त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री ठाकरे दिलेला शब्द का पाळत नाहीत? असाही सवाल मेटे यांनी केला.

Edited By - Amit Golwalkar


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com