उद्धव ठाकरेंना कठोर निर्णय घेता येत नाहीत...   

सध्याच्या घडीला आठ यंत्रणा माझा फोन टॅप करत आहेत. मी सरळ-सरळ हा आरोप करत आहे.
 Prakash Ambedkar, Uddhav Thackeray.jpg
Prakash Ambedkar, Uddhav Thackeray.jpg

पुणे : राज्यात नवीन सरकार सत्तेत यावे, हे गुन्हेगारी सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील पाच वर्षही सत्तेत होते. ठाकरे यांना कणा नाही, त्यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की राज्य सरकार अधिकाऱ्यांना कलेक्शन करायला सांगत आहे. ही राज्याची परिस्थिती झाली आहे. गृहमंत्री यांना कोणी सांगितले, पक्षाने सांगितले का? मंत्रिमंडळामध्ये हा विषय झाला होता का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

राज्यात सध्या फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच गाजत आहे. सध्याच्या घडीला आठ यंत्रणा माझा फोन टॅप करत आहेत. मी सरळ-सरळ हा आरोप करत आहे. मात्र, मी कुणाकडे पैसे मागत नाही. त्यामुळे मला कसलीही भीती वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोना वाढत आहे. १९ लॅबचे कोरोना सर्टिफिकेट चालणार नाही, असे अमरावतीत समोर आले आहे. या लॅबमध्ये पॅाझिटिव्ह आलेले नागरिक सरकारी रुग्णालयांमध्ये निगेटिव्ह येत आहेत. कोणत्या लॅबचा रिपोर्ट खरा हा प्रश्न आहे. कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात रॅकेट सुरूआहे, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. 

राजेश टोपे म्हणाले की ८० % लोकांना कोणतीही लक्ष्ण दिसत नाहीत. ते लोक गृह विलगीकरणात राहू शकतात. लॉकडाऊन असतांना सुद्धा रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊनला माझा विरोध आहे. जम्बो कोव्हीड सेंटर पुन्हा सुरू केले जात आहेत. जम्बो कोव्हीड सेंटर आता कॉन्ट्रॅक्टवर दिलीय, तिथे अजिबात चांगली परिस्थिती नाही. प्रायव्हेट डॉक्टरांना तिथे रेफर केले जात आहे. सरकारने स्वतः जम्बो कोव्हीड सेंटर चालवावे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच आदेशाची पायमल्ली करतात. तिथे एकाही पोलिसांनी मोदींवर केस केली नाही. माझे आवाहन आहे, त्यांनी मोदींवर केस करून दाखवावी. बंगालच्या लोकांना डिवचले तर चालत नाही. मोदी वारंवार तिथे जाऊन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करतात. ज्या- ज्या वेळी मोदी पश्चीम बंगालमध्ये जाऊन प्रचार करतील तेव्हा ममता बॅनर्जी यांच्या पाच-पाच जागा नक्कीच वाढत जातील, असेही आंबेडकर म्हणाले.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com