प्रदीप गारटकरांची नाराजी प्रशासनावर; मात्र रोख कुणाकडे? 

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा इंदापूर तालुक्‍यात 2400 वर पोचला आहे.
Pradip Garatkar is displeased with the administration over the facilities available to Corona patients
Pradip Garatkar is displeased with the administration over the facilities available to Corona patients

वालचंदनगर (जि. पुणे) : "कोरोनाबाधित रुग्णांना इंदापूर तालुक्‍यात पुरेशा सुविधा मिळत नाहीत, बेडशीटसुद्धा उपलब्ध होत नाहीत, याबाबत तहसीलदारांकडे विचारणा केली असता पैसे नाहीत, असे सांगितले जाते,' असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासमोरच प्रशासनाला धारेवर धरले.

गारटकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले असले तरी त्यांच्या रोख कोणाकडे होता, अशी कुजबूज तालुक्‍यात सुरू आहे. कारण, तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच आहेत. 

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा इंदापूर तालुक्‍यात 2400 वर पोचला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत वालचंदनगर येथे तालुक्‍याची आढावा बैठक झाली. या वेळी प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकासधिकारी विजयकुमार परीट, इंदापूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, वालचंदनगरचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, भिगवणचे पोलिस निरीक्षक जीवन माने, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रदीप टेंगल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील गावडे, डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. प्रशांत महाजन उपस्थित होते. 

बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. इंदापूरमधील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचे जाहीरपणे बैठकीत सांगितले. वीज गेल्यानंतर जनरेटरची सोय नसल्याने भाडोत्री जनरेटर आणावा लागला. आम्ही जनतेची सेवा करणार असून वेळप्रसंगी जनरेटरचे भाडेही देण्यास तयार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना बेडशीट व इतर सुविधा मिळत नाहीत. 

बेडशीटसंदर्भात तहसीलदारांशी संपर्क साधल्यानंतर पैसे उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळत आहे. निमगावच्या कोविड सेंटरमध्ये ही रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी मिळत नाही. सध्या तालुक्‍यामध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रम अंर्तगत सुरु असलेल्या आरोग्य तपासणीमध्ये सर्व नागरिकांची तपासणी होत नसल्याचा धक्कादायक खुलासाही गारटकर यांनी केला आहे. एकूणच गारटकर यांनी प्रशासनाच्या चालढकलीच्या कामावर मंत्र्यांसमोरच नाराजी व्यक्त केली. 


रेमडेसिव्हर विकत आणण्याचा सल्ला 

इंदापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात 5 पेशंट व्हेटिंलेटरवर, तर 38 रुग्ण ऑक्‍सिजनवर आणि निमगाव केतकीमधील कोविड सेंटरमध्ये 18 रुग्ण ऑक्‍सिजनवर उपचार घेत आहे. रुग्णांच्या तुलनेमध्ये तालुक्‍यामध्ये प्रशासनाकडे केवळ 25 रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध आहेत. ऑक्‍सिजन लावलेल्या एका रुग्णाला 5 इंजेक्‍शन द्यावे लागतात. इंजेक्‍शनचा तुटवडा असल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्‍शन विकत आणण्याचा सल्ला डॉक्‍टर देत असून जेवणही चांगले मिळत नसून स्वच्छतागृह अस्वचछ असल्याचे रुग्णांनी सांगितले. 

प्रशासनाचे एकत्रित प्रयत्न हवेत 

महसूल विभाग, पंचायत समिती व तहसीलदार, गटविकासधिकारी आणि आरोग्य विभागातील तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. मात्र, या विभागात ताळमेळ नसल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com