टप्याटप्याने वीज पुरवठा पूर्ववत होणार... 

वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने महावितरणचे अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे करीत आहेत.
1Odisha_Cyclone_Fani_bites
1Odisha_Cyclone_Fani_bites

पुणे : ‘निसर्ग’ वादळामुळे पुण्यासह जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून अनेक ठिकाणी वीज खंडीत झाली आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता महावितरणने व्यक्त केली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड, बारामती, मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड परिसरातील वीजवाहिन्यांना सर्वात जास्त तडाखा या वादळामुळे बसला आहे. यातील काही भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरू करण्यात आला असून अजूनही अनेक परिसरात वीज नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने महावितरणच्या वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे करीत आहेत.
      

बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, पुरंदर व भोर तालुक्यातील 362 गावांमधील वीजपुरवठा बुधवारी विस्कळीत झाला होता. त्यापैकी 80 टक्के भागातील वीजपुरवठा सायंकाळीपर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे. उर्वरित भागातील वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे ते काढण्याचे काम सुरू आहे. जोरदार पावसामुळे तसेच क्रेन उपलब्ध न झाल्याने रात्री हे काम करता आले नाही. आज सकाळपासून झाडे हटवण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती महावितरण विभागाचे जनसंपर्क अधिकारी शशिकांत राऊत यांनी दिली. 

सोसाट्यांमध्ये पाणी शिरल्याने पाण्याचे पंप बंद पडले. त्यामुळे अनेक नागिराकांना मिळाले नाही. त्यामुळ महापालिकेच्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. पुण्यात 85 वीजवाहिन्यांमधील वीज खंडीत झाली आहे. यात मुंढवा, हडपसर, मगरपट्टा, महंमदवाडी, कात्रज, कोरेगाव पार्क, कोथरूड, बिबवेवाडी, धनकवडी, तळजाई पठार, शिवणे, वारजे परिसर, रास्तापेठ, एनआयबीएम रोड, खडी मशीन चौक, कोंढवा, उंद्री, येवलेवाडी, वानवडी, गुरुवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, धायरी, रामटेकडी, पिसोळी, केशवनगर, गांधीभवन परिसर, अंबिकानगर, भिलारेवाडी, गंगाधाम रोड आदी भागांचा समावेश आहे. 

या तालुक्यांना सर्वाधिक फटका

वादळी पावसामुळे वीजयंत्रणेला मोठा तडाखा  पिंपरी चिंचवड व भोसरीमध्ये बसल्याने बहुतांश भागातील वीजपुरवठा बंद पडला. आकुर्डी, मोशी, चऱ्होली, सांगवी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, रावेत, वाकड, बिजलीनगर, खराळवाडी, पिंपळे सौदागर आदी भागांतील सुमारे 112 वीजवाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील भीमाशंकर,  नारायणगाव, नाणेघाट, मंचर, घोडेगाव, नारायणगाव, पिंपळवंडी,डिंभे, आपटाळे, ओतूर, आळेफाटा या परिसरात वादळामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com