पूजा चव्हाणच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती उघड 

राज्यात मागील अनेक दिवसांपासून टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चर्चा सुरु आहे.
puja chavan .jpg
puja chavan .jpg

पुणे : राज्यात मागील अनेक दिवसांपासून टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चर्चा सुरु आहे. या प्रकरणात दररोज एक नवा खुलासा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल वानवडी पोलिसांना प्राप्त झाल्याचे कळत आहे. प्राथमिक अहवालाप्रमाणेच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीनेच पूजाचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालामुळे पूजाच्या मृत्यूच्या किमान मुळ कारणापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत मिळाली आहे. 

पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल वानवडी पोलिसांना यापुर्वी मिळाला होता. त्यामध्ये तिच्या डोक्‍याला आणि मणक्‍याला जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यु झाल्याचे नमूद केले होते. वानवडी पोलिसांनी यापुर्वीच हे स्पष्ट केले होते. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे, त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच याविषयीची अधिक माहिती दिली जाईल असे या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असले, तरी त्यांनी सविस्तर शवविच्छेदन अहवाल मिळाला असल्याचे सांगितले आहे. पूजा चव्हाण हिने ७ फेब्रुवारीला मध्यरात्री वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीच्या दुसर्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. 

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शनिवारी (ता. २८ फेब्रुवारी) पदाचा राजीनामा दिला आहे. 

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सुई वळली होती. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रान उठवले होते. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून जोरदारपणे केली होती. विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून (ता. १ मार्च) सुरु झाले आहे. अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार असल्याचे विरोधकांनी सांगितले होते. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com