ही कविता ऐकाच! : केंद्रातील नेत्यांना वर्षा गायकवाडांचा सल्ला

शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने यावरून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या मंत्र्यांना लक्ष केले.
vg27.jpg
vg27.jpg

पुणे : "शेतकऱ्यांची नाळ मातीशी कशी जोडलेली असते..." हे कळण्यासाठी केंद्रातील काही मंत्र्यांनी ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या कविता ऐकल्या पाहिजेत, म्हणजे त्यांना परिस्थितीची जाणीव होईल," अशी टीका शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.

बालभारतीचा ५४ वा वर्धापनदिनानिमित्त आयोजन कार्यक्रमात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोलत होत्या. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने यावरून वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या मंत्र्यांना लक्ष केले.  

शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, इंद्रजीत भालेराव, बालभारती नियंत्रक विवेक गोसावी, माजी आमदार उल्हास पवार आदी यावेळी उपस्थित होते. भालेराव यांनी 'बाप', 'गावाकडे चल माझ्या दोस्ता' अशा कविता सादर करताना शेतकऱ्यांची स्थिती सांगितली. हाच धागा पकडून वर्षा गायकवाड यांनी टीका केली. 

"इंद्रजीत भालेराव यांचे भाषण केंद्रातील लोकांनी ऐकायला हवे होते. शेतकरी, माय, बाप यांची नाळ मातीशी कशी जोडली गेली आहे हे कवितेतून सांगितले. आपले शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत, अशा स्थितीत शेतकऱ्यांची काय स्थिती कशी आहे, हे सरकारला कळायला पाहिजे, असे गायकवाड म्हणाल्या.

माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता...

काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता

कशी उन्हात तळतात माणसे
कशी मातीत मळतात माणसे माणसे
कशी खत जीवाला खस्ता
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता 

काळ्या बापाचे हिरवे रान
काळ्या माईने पिकवलेल सोन
पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता 

इथे डब्यात तुला साखर लागते गोड
तिथे शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड
पण भाव ठरतो त्याला न पुसता
 
जेव्हा दुष्काळ घरट्या घाली
तेव्हा गावाला कुणी ना वाली
कशी घालतात सुजित गस्ता
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता
  
ह्या भूमीचा मूळ अधिकारी
बग झालाय आज भिकारी
आज गाव असून झाला फिरस्ता
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता

- इंद्रजित भालेराव  


"वर्षा गायकवाड हाय हाय"
बालभारती येथे कार्यक्रम सुरू असताना काही पालकांनी "वर्षा गायकवाड हाय हाय"च्या घोषणा दिल्या. शाळा आम्हाला धमकावत आहेत, शुल्क भरा नाही तर पुढच्या वर्षी प्रवेश देणार नाही, असे सांगत आहेत. कोणतीही तक्रार केली की आमचा नाही संबंध नाही असे म्हणून हात वर करत आहेत, असा आरोप पालकांनी केला आहे.
 
आपटे प्रशालेला भेट

पुण्यातील डेक्कन परिसरातील आपटे प्रशालेला आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भेट दिली, पुणे शहरात सध्या 9 ते 12 वीचे वर्ग सुरु झालेत, यापैकी 10 वीच्या वर्गांना वर्षा गायकवाड यांनी भेट दिली यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत नियमांची अंमलबजावणी कशा प्रकारे होतेय याचा आढावा ही गायकवाड यांनी घेतला. 9 वी ते 12 वी नंतर आजपासून 5 वी 8 चे वर्ग सुरु झालेले आहेत, मात्र  मुंबई  आणि पुण्यातील परिस्थिती लक्षात घेऊन वर्ग टप्प्याटप्प्याने सुरु होतील असंही त्यांनी सांगितलं.

Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com