पार्थ पवारांनी घेतली भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट... - politics Parth Pawar meets BJP leader Harshvardhan Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

पार्थ पवारांनी घेतली भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट...

दिपक शिंदे  
मंगळवार, 30 मार्च 2021

पार्थ पवार यांनी भाजप नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली.

बावडा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे युवानेते पार्थ पवार यांनी भाजप नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली.

हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील यांच्या मातोश्री अनुराधा (माई) अरुणराव पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या सांत्वन भेटीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, मोहोळचे आमदार यशवंत माने, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, यांच्यासह इंदापूर, बारामती, दौंड, माळशिरस तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.  

पीपीटी किट घालून जिल्हाधिकाऱ्यांचा रुग्णांशी संवाद..

सोमवारी (ता.२९) सायंकाळी पार्थ पवार यांनी हर्षवर्धन पाटील, मयुरसिंह पाटील आणि पाटील कुटुंबीयांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार या दोघांनी आघाडी सरकारमधील मंत्रीमंडळामध्ये १५ वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. मात्र, राज्याच्या राजकारणामध्ये दोघे ही एकमेकांचे राजकीय विरोधक मानले जातात. अजित पवार इंदापूर मध्ये आल्यानंतर त्यांच्या खास शैलीमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करीत असतात. 

अजित पवार यांच्या पाठिंब्यामुळेच  दत्तात्रेय भरणे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते राज्यमंत्री होण्याची संधी मिळाली. सांत्वन भेटीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांची चिरंजीव राजवर्धन पाटील, कन्या व पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ही उपस्थित होत्या. अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांची नवीन पिढीने राजकारणामध्ये प्रवेश केला आहे.

पार्थ पवार यांनी २०१९ ची मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी राज्यामध्ये संपर्क वाढवला आहे. तर हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता जिल्हा परिषदेचे सदस्य असून तालुक्यामध्ये दांडगा संपर्क आहेत. राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनीही तालुका पिंजून काढला असून सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख