धक्कादायक : बनावट डॉक्टरांकडून चालवले जात होते कोविड सेंटर 

पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीतआहोत.
Police Taken into custody fake doctor running Kovid Center
Police Taken into custody fake doctor running Kovid Center

शिक्रापूर (जि. पुणे)  ः शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील मोरया हॉस्पिटल नावाने कोविड केअर सेंटर चालविणाऱ्या बोगस डॉक्टरचे प्रकरण ताजे असतानाच शिक्रापूर येथेही डॉक्टर म्हणून पात्रता नसलेल्या काही जणांकडून कोविड सेंटर चालविण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात प्रांताधिकारी संजयकुमार देशमुख यांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. 

याबाबत शिक्रापूर पोलिस, महसूल विभाग व आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे आधार या नावाने काही दिवसांपासून एक हॉस्पिटल सुरु आहे. या हॉस्पिटलकडून कोविड सेंटर उभारून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले होते.

या हॉस्पिटलमधून रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना भीती दाखवून गैरप्रकार होत असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी स्वत: देशमुख, शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद आदींनी छापा टाकला. त्यांनी संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली. 

या पाहणीत संबंधित हॉस्पिटल हे डॉ.निखील इंगळे यांच्या नावावर नोंदणी असल्याचे निदर्शनास आले. रामेश्वर बंडगर नावाचा व्यक्ती डॉक्टर म्हणून तब्बल 16 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असल्याचे या वेळी निदर्शनास आले. या वेळी प्रशासनाने येथील सर्व रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये हलविले आहे. येथील रामेश्वर बंडगर, गजानन बंडगर, प्रशांत मोरे, राहुल पवळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शिक्रापूर पोलिस ठाण्यात सुरू आहे. पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com