याची पुसटशी कल्पना मारणेला नव्हती : पोलिस आयुक्त  - The police commissioner had no idea that the killer would be arrested | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

याची पुसटशी कल्पना मारणेला नव्हती : पोलिस आयुक्त 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

नागरिकांमध्ये दहशत करत कायदा आणि सुव्यस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या गुंडांविरोधात यापुढील काळात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे : नागरिकांमध्ये दहशत करत कायदा आणि सुव्यस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या गुंडांविरोधात यापुढील काळात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गजा मारणेवर केलेली कारवाई म्हणजे ‘ट्रेलर’ आहे, असा इशारा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. 

शक्तिप्रदशर्न करणाऱ्या गुंड गजानन उर्फ गजा मारणे आणि गुंड शरद मोहोळसह त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी एकापाठोपाठ शहरातील दोन गुंडांविरोधात कारवाई केल्याने गुंडांना जरब बसली आहे.

या कारवाईनंतर आयुक्त गुप्ता म्हणाले, ‘‘शहरातील गुंडांना जरब बसविण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. सामान्यांना वेठीस धरणाऱ्या गुंडांची खैर केली जाणार नाही. शक्तीप्रदर्शन करणे तसेच जमाव जमवणे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कायदा-सुव्यस्थेला बाधा पोहचविणाऱ्या गुंडांविरोधात यापुढील काळात कडक कारवाई करण्यात येणार आहे.’’

 पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी नवाब मलिकांचा राठोडांना 'हा' सल्ला...

नागरिकांच्या रक्षणासाठी पोलिस आहेत. मी नागरिकांना उत्तर देण्यास बांधील आहे. सामान्यांना त्रास देणाऱ्या गुंडांविरोधात कडक कारवाईची मोहिम यापुढील काळात तीव्र करण्यात येणार आहे. तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्या गजा मारणेला मंगळवारी कोथरूड पोलिस ठाण्यात आणून, त्याला अटक करण्यात आली. पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई होईल, याची पुसटशी कल्पना मारणेला नव्हती. या कारवाईतून गुंडांनी धडा घ्यावा, असे त्यांनी सांगितले. 

मारणे याची मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका झाल्या, त्याच्या हजारो समर्थकांनी तळोजा कारागृहासमोरच मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत आरडाओरड केला. फटाके फोडण्याबरोबरच ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरणही केले. चित्रीकरण करीतच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन 400 ते 500 अलिशान गाड्यांमधून जंगी मिरवणुक काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात दोन जण पुणे पोलिसांच्या ताब्यात 
 

यासंदर्भातील व्हिडीओ काही वेळातच सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. मारणे निर्दोष सुटलेल्यानंतर 500 वाहनांसह शक्तिप्रदर्शन करून त्याचे व्हिडिओ क्लिप व्हायरल, केल्या प्रकरणी त्याला व त्याच्या साथीदारांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी हा आदेश दिला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख