पीएमपी संचालक बदलण्याच्या प्रकरणाला वेगळे वळण..वाद पोचला पोलिसांपर्यंत..

बैठकीचा वृत्तांत मिळावा यासाठी मोहोळ आणि पवार यांनी प्रशासनाकडे आग्रह धरला.
download.jpg
download.jpg

पुणे : पीएमपीचे संचालकपद बदलण्याच्या वादातून स्वारगेट पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या. या घटनेमुळे संचालक बदलण्याच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पीएमपीच्या संचालकपदाचा शंकर पवार यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यावरून सध्या भाजप वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे. PMP director issue has reached the police 

पीएमपीएमएलने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, तर पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी धमकी दिल्याची तक्रार त्या दोन कर्मचाऱ्यांनी स्वारगेट पोलिसांकडे दिली आहे. दोन्ही तक्रारींबाबत स्वारगेट पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. 

मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीचा वृत्तांत आणि झूम मिटिंगच्या बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मागण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पीएमपीचे माजी संचालक शंकर पवार शुक्रवारी दुपारी पीएमपीच्या कार्यालयात गेले. पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप रजेवर होते. संचालक मंडळाच्या बैठकीचा वृत्तांत मिळावा यासाठी मोहोळ आणि पवार यांनी प्रशासनाकडे आग्रह धरला. संचालक मंडळाच्या झूम मिटींगचे रेकॉर्डिंग प्रशासनाने देण्याची तयारी दर्शवली. परंतु बैठकीचा वृत्तांत अद्याप तयार नसल्यामुळे नंतर देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर महापौर मोहोळ यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात जाऊन तेथील संगणक सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीएमपीच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अटकाव केला. महापौर मोहोळ  तेथून गेल्यानंतर पोलिस आले. 

पीएमपीने याबाबत स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर महापालिकेच्या दोन संबंधित कर्मचाऱ्यांनीही स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली, त्यात पीएमपीचे अध्यक्ष डॉक्टर जगताप यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे धमकी दिल्याचे म्हटले आहे.

या घटनेबाबत महापौर मोहोळ म्हणाले, "संचालक मंडळीच्या बैठकीचा वृत्तांत आणि झूम मिटींगचे रेकॉर्डिंग जगताप यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवणे बेकायदेशीर आहे पीएमपीच्या संचालक मंडळाला उपलब्ध करून देणे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु ते न करता जगताप या प्रकरणाला वेगळे वळण देत आहेत".

याबाबत स्वारगेट पोलिसांकडे विचारणा केली असता दोन्ही बाजूच्या तक्रारी मिळाले आहे त्यावर शनिवारी कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता ते उपलब्ध झाले नाहीत. मात्र पीएमपी कार्यालयातील संबंधित अधिकारी म्हणाले, "बैठकीचा वृत्तांत आणि झूम कॉल रेकॉर्डिंग मागण्यासाठी एक प्रक्रिया असते त्याची अंमलबजावणी महापौर आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी तसे न करता दमबाजी केली."
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com