corona 11
corona 11

पुणेकरांनो या नव्या सूचना लक्षात ठेवा : अन्यथा दंड भरण्याच्या तयारीत राहा!

व्यापाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी

पुणे : राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनांची अंमलबजाणी पुणे शहरात होणार असून जीवनाश्यक वस्तू वगळता उर्वरीत सर्व दुकाने येत्या 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे महापालिका आय़ुक्त विक्रमकुमार यांनी जारी केला. दारू दुकाने ही अत्यावश्यक नसल्याने ती सुद्धा बंद राहणार आहेत. या निर्णय़ांची अंमलबजावणी पाच एप्रिलपासूनच सुरू झाली आहे. 

बार, रेस्टाॅरंटस हे ग्राहकासाठी बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतूक ठरल्याप्रमाणे येत्या शुक्रवारपर्यंत बंद राहणार आहे.  राज्य सरकारने ब्रेक दे चेन म्हणून नवीन सूचना काल जारी केल्या होत्या. त्यानुसार पुण्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्य सरकारने सायंकाळी सातनंतर संचारबंदी लागू केली आहे. पण पुण्यात आधी ठरल्याप्रमाणे सायंकाळी सहानंतरच ती सुरू राहणार आहे. प्रत्येक नियमाच्या उल्लंघनाबद्दल दंडाची तरतूद करण्यात आली आहे. 

या निर्णयाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून सत्तेपुढे शहाणपण चालत नसल्याची टीका व्यापारी महासंघाचे फत्तेचंद रांका यांनी व्यक्त केली. पुण्यात या आधी दिवसभरात इतर दुकानेही सुरू ठेवण्याची परवानगी होती. ती आता रद्द झाली आहे. वाईन शाॅप, दारूची दुकानेही बंद झाल्याने मद्यशौकिनांची मात्र निराशा होणार आहे. 

  • सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत पाच पेक्षा जास्त लोकांना येण्यास प्रतिबंध (जमावबंदी)
  • सोमवारी ते शुक्रवारी सायंकाळी सहा ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी 
  • शुक्रवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी सातपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर पडण्यास संपूर्णतः बंदी. पूर्णतः लाॅकडाऊन
  • रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, विमा, औषध, किराणा भाजीपाला, मिठाई, बेकरी, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहणार
  • खासगी बस, रिक्षा रेल्वे सुरू राहणार असल्याचे यात म्हटले आहे (पीएमपीएलचा निर्णय नऊ एप्रिल रोजी घेणार)
  • उद्याने, मैदाने शुक्रवारी सायंकाळी सात ते सोमवारी सकाळी सात बंद राहतील
  • सर्व प्रकारची दुकाने, मार्केट व माॅल (अत्यावश्यक सेवा वगळून) संपूर्ण बंद राहतील
  • अत्यावश्यक सेवांच्या दुकानांत कोरोना नियमांचे काटेकोर नियमांचे पालन. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण आवश्यक. ग्राहकांशी कमीत कमी संपर्क येईल, अशा पद्धतीने कामकाज करावे
  • सर्व दुकानांचे चालक, मालक यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे
  • रिक्षात वाहनचालक व दोन व्यक्तींना परवानगी
  • टॅक्सी, कॅब, चारचाकीमध्ये 50 टक्के क्षमतेसह
  • खासगी बसमध्येही उभे राहून प्रवासास मनाई
  • प्रत्येक ट्रीपनंतर वाहन हे सॅनिटाईज करावे
  • सार्वजनिक वाहतूक सेवेतील कर्मचारी, चालक यांचे लसीकरण आवश्यक. तोपर्यंत त्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी. लसीकरण अथवा कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक. अन्यथा 1000 रुपये दंड
  • रेल्वेत उभे राहून प्रवासास मनाई. अन्यथा 500 रुपये दंड
  • नऊ एप्रिलपर्यंत पीेएमपीएल बंदच राहणार
  • ......................
  • बॅंका, विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्या, दूरसंचार, विमा, मेडिक्लेम, औषध निर्माण, वकिल, सीए, वित्तीय संस्था आयटी, आयटीएस, सर्व्हर व इतर आवश्यक काम वगळता इतर सर्व कार्यालये बंद राहणार 
  • शासकीय कार्यालये 50 टक्के उपस्थितीत सुरू राहणार. कोविड संदर्भातील कार्यालये 100 टक्के उपस्थितीत सुरू ठेवता येणार
  • सभा, बैठका आॅनलाईन पद्धतीने आयोजित कराव्यात
  • सरकारी कार्यालयातील, कंपन्यांत अभ्यागतांना प्रवेशास मनाई. वेळ पडल्यास ई-पासची व्यवस्था करावी
  • सरकारी व खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेणे आवश्यक
  • सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क बंद, व्हिडीओ गेम पार्लर, जिम, क्लब पूर्णतः राहणार
  • हाॅटेल, रेस्टाॅरंट, फूटकोर्ट पूर्णतः बंद राहतील. पार्सल सेवा, घरपोच सेवा सोमवारी ते शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत सुरू राहील. यात ग्राहक स्वतः हाॅटेलमध्ये जाऊन पार्सल आणू शकतो. मात्र शुक्रवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी सातपर्यंत फक्त घऱपोच सेवेकरता मुभा राहील. मात्र हाॅटेलमध्ये जाऊन पार्सल आणण्याची मुभा नाही.
  • घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे, हाॅटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण किंवा आरटीपीेसीआर चाचणी आवश्यक. हा नियम दहा एप्रिलपासून अमलात येणार. अन्यथा 1000 रुपये संबंधित कर्मचाऱ्याला दंड. वारंवार भंग झाल्यास संबंधित आस्थापनांचा परवाना निलंबित होणार
  • सर्व प्रार्थनास्थळे बंद राहणार. तेथील कर्मचाऱ्यांचे लसीकरण अथवा कोरोना चाचणी आवश्यक
  • सलून, ब्यूटी पार्लर, केश कर्तनालये संपूर्ण बंद राहतील. येथील कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे.
  • शाळा, काॅलेज बंद राहणार. दहावी व बारावीच्या परीक्षा संदर्भात वर्ग सुरू राहतील.
  • सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील
  • लग्न समारंभासाठी 50 जणांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी
  • मंगल कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण अथवा कोव्हिड चाचणीचा दाखला बाळगणे आवश्यक. अन्यथा दहा हजार रुपये दंड
  • अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीसाठी वीस जणांच्या उपस्थितीच परवानगी
  • रस्त्यावरील स्टाॅल, टपऱ्या येथे अन्नपदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध, फक्त पार्सल घेऊन जाण्यास सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत परवानगी राहील.
  • उत्पादन क्षेत्र पूर्ण क्षमतेने सुरू राहील. येथे सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक. सदर आस्थापनांनी कर्मचाऱ्यांचे तापनाम तपासणीची व्यवस्था करावी.
  • एखादा कामगार कोरोनाबाधित आढळल्यास त्याच्याशी संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आस्थापनांनी स्वखर्चाने विलगीकरण करावे.
  • 500 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनांनी त्यांचे स्वतःचे क्वारंटाईन सेंटर सुरू करावे.
  • जर एखादा कामगार कोरोनाबाधित आढळल्यास संपूर्ण युनिट बंद ठेवून सॅनिटाईज करावे.
  • चहा व जेवणाच्या सुट्यांत कर्मचाऱ्यांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • एखादा कामगार कोरोनाबाधित आढळल्यास त्यांना पगारी वैद्यकीय रजा मंजूर करावी. त्यांची सेवा खंडीत करू नये

.......................

पुण्यातील पाच एप्रिल रोजीची कोरोना रुग्णसंख्या

- दिवसभरात ४०७७ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ३२४० रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ४६ रुग्णांचा मृत्यू. १० रूग्ण पुण्याबाहेरील.
- ९१९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २९४१२१.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४२७४१.
- एकूण मृत्यू -५४८८.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २४५८९२.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १८७२०.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com