सायलेन्सर बदलून बुलेटवर धूम ठोकणाऱ्या साडेतीनशे जणांवर कारवाई...  

सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजात बुलेटची धूम ठोकणाऱ्या बुलेट चालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अवघ्या एका महिन्यात 350 बुलेट चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.​
बुलेट - Copy.jpg
बुलेट - Copy.jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजात बुलेटची धूम ठोकणाऱ्या बुलेट चालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अवघ्या एका महिन्यात 350 बुलेट चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. 

याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेश दिले होते. अनेक नागरिकांनी तक्रारी देखील आल्यानंतर बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून साडेतीन लाख दंड वसूल करण्यात आला आहे. तर, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या चालकांकडून दहा लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी माहिती दिली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योग नगरी आहे. इथे राज्यासह इतर शहरातून अनेक जण स्थायिक झाले आहेत. त्यामुळे अनेक व्यक्ती आपला ठसा, दहशत प्रस्थापित करण्यासाठी कर्कश आणि सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजात बिनधास्त बुलेटची राईड मारत असल्याचं दिसत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत होता. अशा काही तक्रारीनंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बुलेट चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यात, फॅन्सी नंबर प्लेट, बुलेटचे सायलेन्सर बदलणे, रॅश ड्रायव्हिंग करणे अशी कारवाई पोलीस करत आहेत. 


बुलेटचे सायल्सर बदलणाऱ्यांची संख्या  

हिंजवडी पोलीस ठाणे 15
निगडी 73 
चिंचवड 03 
पिंपरी 202 
भोसरी 02
देहूरोड 20 
तळवडे 35 

 हेही वाचा  : मनसेचे उपशहराध्यक्ष राकेश पाटील यांची धारधार शस्त्राने हत्या  

अंबरनाथ :  अंबरनाथ मधील पाले गावात असलेल्या पटेल आर मार्ट या शॉपिंग मॉल बाहेर उभे असलेले अंबरनाथ शहराचे मनसेचे उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. बुधवारी सांयकाळी हा हल्ला झाला. हल्ल्यात जखमी राकेश पाटील यांना रुग्णालयात उपचारार्थ घेऊन गेले असता त्यांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला सहा जणांनी केला असून ते दोन कार मधून आल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. हि हत्या व्यावसायिक वादातून झाल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या झाल्याचे कळताच अंबरनाथ सहाययक पोलीस आयुक्त विनायक नराळे यांनी जवळील उल्हासनगर, बदलापूर, मुरबाड पोलिसांना अलर्ट केले आणि नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान  काही तासातच मुरबाड पोलिसांनी चार संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. आता दोन आरोपींच्या शोध कामी पोलीस लागले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com