शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करुन फोन..चाकण पोलिसांकडे तक्रार

शरद पवार यांचा आवाजातून एक फोन चाकण येथील एका व्यक्तीला आला.
1WhatsApp_20Image_202021_03_14_20at_2012.54.16_20PM.jpeg
1WhatsApp_20Image_202021_03_14_20at_2012.54.16_20PM.jpeg

चाकण (पुणे)  : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करुन 'जमीन व्यवहाराबाबत प्रकरण मिटवा,' असा फोन आल्याने खडबळ उडाली आहे. चाकण पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याचे समजते. याबाबत पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे. आज दुपारी पोलिस आयुक्त याबाबत पत्रकार परिषद घेणार आहे.  

मुंबई येथील सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानातून बोलत असल्याचे सांगून पवार यांचा आवाजातून एक फोन चाकण येथील एका व्यक्तीला आला. याप्रकरणी सध्या गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

फिर्यादी यांनी २०१५ मध्ये केलेल्या जमीन व्यवहाराबाबत हा फोन असल्याचे सांगण्यात आले. हा व्यवहार दडपण्यासाठी कुणीतही पवार यांच्या आवाज काढून हा 
कॉल केला असल्याचे समजते.   
 
मनसे नेते गजानन काळेंवर गुन्हा दाखल, पत्नीकडून मारहाण केल्याचा आरोप
नवी मुंबई :  मनसे  MNS शहर अध्यक्ष गजानन काळे Gajanan Kale यांच्यावर त्यांच्याच पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत आणि मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्हावासीयांना गुड न्यूज ; म्हैसाळ योजनेचा मार्ग मोकळा 
सांगली : गेली अनेक वर्षे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यातील ६५ गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी एकूण ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास कळविण्यात आलेले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com