ग्रामपंचायत हद्दीतील लॉकडाउनच्या दंडाची रक्कम जमा होतेय पुणे महापालिकेच्या तिजोरीत

या दोन्ही पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी महापालिकेच्या पावत्या वापरत आहेत.
Penalty amount during lockdown in Gram Panchayat's boundrys collect in the treasury of Pune Municipal Corporation
Penalty amount during lockdown in Gram Panchayat's boundrys collect in the treasury of Pune Municipal Corporation

उरुळी कांचन (जि. पुणे) : लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवणाऱ्या लोणी काळभोर, लोणीकंद, वाघोली, उरुळी कांचन, थेऊरसह पूर्व हवेलीतील पंचवीसहून अधिक ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडात्मक रकमेवर कायद्याने संबंधित ग्रामपंचायतीचा हक्क आहे. असे असूनही पोलिस व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यातील समन्वयाअभावी ही दंडाची रक्कम मात्र पुणे महापालिकेच्या तिजोरीत जमा होत असल्याचे पुढे आले आहे. (Amount of penalty during lockdown period in Gram Panchayat's boundrys collect in the treasury of Pune Municipal Corporation)

लोणी काळभोर व लोणीकंद या दोन्ही पोलिस ठाण्यांचा सामावेश पुणे पोलिस आयुक्तालयात करण्यात आलेला आहे. या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील लोणी काळभोर, लोणीकंद, वाघोली, उरुळी कांचन, थेऊरसह पूर्व हवेलीमधील २५ हून अधिक ग्रामपंचायती जिल्हा परीषदेच्या अखत्यारीत आहेत. लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यासाठी लोणी काळभोर व लोणीकंद या दोन्ही पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी महापालिकेच्या पावत्या वापरत आहेत. यामुळे दंड ग्रामीण भागातील नागरीक भरत असले तरी दंडाची रक्कम मात्र पुणे महानगरपालिकेकडे जात आहे. 

ग्रामीण भागातील नागरिकांकडून वसूल होणारा दंड पुणे महापालिकेच्या तिजोरीत जात असल्याबद्दल लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर व उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागातील नागरिकांकडून वसूल होणारा दंड पुणे महापालिकेच्या तिजोरीत जाणे, ही बाब ग्रामपंचायतीच्या अधिकारावर गदा आणणारी आहे. यापुढील काळात पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी राजाराम काळभोर व संतोष कांचन यांनी लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्याकडे केली आहे. 

जिल्हा (ग्रामीण) पोलिस दलाच्या हद्दीतील लोणी काळभोर व लोणीकंद या दोन्ही पोलिस ठाण्यांचा सामावेश २२ मार्च २०२१ रोजी पुणे पोलिस आयुक्तालयात करण्यात आलेला आहे. या दोन्ही पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत असणाऱ्या लोणी काळभोर, लोणी कंद, वाघोली, उरुळी कांचन, थेऊरसह पूर्व हवेलीमधील २५ हून अधिक ग्रामपंचायती अद्यापही जिल्हा परिषद अंतर्गत आहेत. यामुळे सर्वच ग्रामपंचायतीत जिल्हा परीषदेचा कायदा चालतो. मात्र  लोणी काळभोर व लोणीकंद या दोन्ही पोलिस ठाण्याचे कर्मचारी, कोविड काळात शहरातील नियमांनुसार कायदा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत

याबाबत अधिक माहिती देतांना लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर व व उपसरपंच ज्योती काळभोर म्हणाल्या, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचा समावेश पुणे शहर आयुक्तालयात झालेला असला तरी, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावे मात्र जिल्हा परीषदेच्या अखत्यारीत आहेत. लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवणाऱ्याकडुन दंड वसुल करताना पोलिस महानगरपालिकेच्या पावत्या वापरत असल्याने, ग्रामिन भागातील नागरीकांच्याकडुन वसुल होणारा दंड महानगरपालिकेच्या तिजोरीत आपोआप जमा होत आहे. पोलिसांनी दडांच्या पावत्या ग्रामपंचायतीच्या वापरणे गरजेचे आहे. यापुढील काळात तरी पोलिसांनी कारवाई करताना ग्रामपंचायतीच्या पावत्या वापरणे गरजेचे आहे. 

याबाबत उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन व उपसरपंच संचिता कांचन म्हणाल्या, लॉकडाऊन काळात उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पुणे पोलिस चांगले काम करत आहेत. मात्र, कायदा मोडणारे नागरीक व व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करताना पावत्या मात्र महापालिकेच्या वापरत आहेत. हा प्रकार ग्रामपंचायतींवर अन्याय करणारा आहे. पुणे पोलिसांनी कारवाई करताना ग्रामीण स्तरावरील नियमावलींशी आधीन राहून कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.


वरीष्ठ अधिकारी निर्णय घेतील : वरीष्ठ पोलिस निरीक्षक  

लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी याबाबत म्हणाले की, लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवणाऱ्या नागरिकांकडून वसूल करण्यात येणारा दंड महापालिकेच्या खात्यात जमा होतो, ही बाब खरी आहे. पोलिसांनी जमा केलेला दंड ग्रामपंचातींना मिळावा, अशी मागणी लोणी काळभोर व उरळी कांचन ग्रामपंचायतीने केलेली आहे. याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आलेले आहे. यामुळे याबाबत वरीष्ठ अधिकारी योग्य तो निर्णय घेतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com