आमदार मोहितेंच्या मागणीला गृहमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद ! - Pay attention to development works in Khed taluka Dilip Mohite Dilip Walse Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

आमदार मोहितेंच्या मागणीला गृहमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद !

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 14 जून 2021

सर्व कामे मार्गी लावणे माझी जबाबदारी आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

मंचर : आंबेगाव तालुक्यातील सर्व कामे मार्गी लावणे माझी जबाबदारी आहे, पण दिलीपराव माझा जन्म खेडचा आहे, खेड तालुक्याशी माझी बांधिलकी आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. खेड तालुक्यालाही विकास कामांसाठी काही कमी पडू देणार नाही, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्याकडे कटाक्ष टाकत सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शिवनेरी जम्बो कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात बऱ्याच कालावधीनंतर खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी आंबेगाव तालुक्यातील वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे मोहिते काय बोलणार याविषयी उपस्थितांमध्ये उत्सुकता होती. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी मंत्री वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील कोरोना उपाययोजनांबाबत कामाचे कौतुक करताना "तुम्ही फक्त आंबेगाव तालुक्याचे नाही तर राज्याचे ग्रहमंत्रीआहात. आंबेगाव तालुक्याप्रमाणे जरा खेड तालुक्यावरही विकास कामांसाठी लक्ष द्या अशी कोटी केली होती. 

आमदार मोहिते यांच्या या कोटीला उत्तर देताना मंत्री वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यात गेली सव्वा वर्ष कोरोना बाधित रुग्णांना अद्यावत आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी केलेल्या कामांची जंत्रीच वाचून अजूनही काही केलेल्या कामाचं सांगायचंय .पण सगळंच आता सांगून टाकणं योग्य नाही, असे सांगून वळसे पाटील म्हणाले" ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच येथे बसलेले सर्व आमदार घडले आहेत. विकास कामाला मदत करा. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवा असे धोरण पवार साहेबांचेआहे. खेड तालुक्यातच माझे आजोळ असल्यामुळे खेडच्या कामांसाठी माझा मदतीचा हात कायम राहिल. येथे अद्यावत स्वरुपाच्या होणाऱ्या जंबो कोवीड हॉस्पिटल चा उपयोग आंबेगाव प्रमाणेच खेड जुन्नर शिरूर तालुक्यातील रुग्णांना होणार आहे.
याप्रसंगी आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके. माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्यासह जिल्हाधिकारी राजेश देशमुख , पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ  अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना जाणूनबुजून टाळलं... 
पुणे : मराठा आरक्षणासाठी उदयनराजे भोसले व संभाजीराजे छत्रपती यांची आज पुण्यात भेट झाली. यावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "संभाजी राजे मराठा आरक्षणाचा योग्य पाठपुरावा करीत आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यास गेले होते. त्यावेळी त्यांनी संभाजीराजेंना सोबत घेऊन जायला पाहिजे होतं, पण मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना जाणूनबुजून टाळलं," असा आरोप नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी केला आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख