बेड न मिळाल्याने हॉस्पिटलच्या दरवाजातच सोडला रुग्णाने प्राण

त्यामध्ये 31 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
The patient died at the door of the hospital as he could not get a bed
The patient died at the door of the hospital as he could not get a bed

टाकळी हाजी (जि. पुणे) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टाकळी हाजी परिसरात सोमवारी (ता. २६ एप्रिल) एका दिवसात ३१ रुग्ण आढळले आहेत. टाकळी हाजी येथील एकाचा उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यू झाला, तर दुसऱ्या व्यक्तीला बेड न मिळाल्याने त्यांनी मंचर येथील रुग्णालयाच्या दरवाजाजवळच प्राण सोडला, असे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

हनुमंत जबाजी पवार (वय 50) आणि एकनाथ गोविंद जाधव (वय 78, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) असे कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात 123 रूग्ण, तर टाकळी हाजी येथे 50 कोरोनाबाधित रूग्ण असल्याची माहिती टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप बिक्कड यांनी दिली

कोरोनाची लागण झाल्याने हनुमंत पवार यांना आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांच्या भाची संगीता किसन साळवे यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोना झाल्याने एकनाथ जाधव यांना सुरुवातीला मंचर रूग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, बेड न मिळाल्याने त्यांना पुन्हा घरी आणण्यात आले होते. बेडची उपलब्धता करण्यासाठी शिरूर तालुक्यात, नगर जिल्ह्यात सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. मात्र, बेड न मिळाल्याने त्यांना पुन्हा मंचर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्याने रूग्णालयाच्या दरवाजाजवळच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांचा मुलगा दत्ता जाधव याने सांगितले.

दरम्यान, याबाबत मंचर ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॅा. बिक्कड म्हणाले की, शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात एका दिवसात 56 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये 31 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना रूग्ण अधिक वाढत चालल्याने बेड व ऑक्सिजनची सुविधा मिळताना अडचणी येत आहेत. ज्या खासगी दवाखान्यात कोविड रुग्णालयात आहेत, तेथेही खाटा उपलब्ध नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com