उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पार्थ पुण्यात दाखल 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ पवार हे शुक्रवारी (ता. 14) नातेवाइकांशी चर्चा करण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत, तर पार्थ यांचे वडिल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही आज पुण्यात आहेत. अजित पवार यांचा प्रशासकीय दौरा आहे.
Parth arrives in Pune with Deputy Chief Minister Ajit Pawar
Parth arrives in Pune with Deputy Chief Minister Ajit Pawar

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ पवार हे शुक्रवारी (ता. 14 ऑगस्ट) नातेवाइकांशी चर्चा करण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत, तर पार्थ यांचे वडिल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही आज पुण्यात आहेत. अजित पवार यांचा प्रशासकीय दौरा आहे. 

पार्थ पवार हे आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक विशेषतः आपले काका यांच्याशी चर्चा करून आपला पुढील निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या पुणे दौऱ्याला महत्त्व असून ते कोणा कोणाशी चर्चा करणार आणि काय निर्णय घेणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धोरणापेक्षा वेगळी भूमिका घेत राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावरून पार्थचे आजोबा शरद पवार यांनी पार्थला जाहीररित्या फटकारले होते. त्यावरून राज्यात राजकीय गदारोळ उठला आहे. विशेषतः पवार कुटुंबातील कोणताही सदस्य यावर बोलायला तयार नाही, त्यामुळे या प्रकरणाचे कुतूहल वाढत आहे. 

पार्थ पवार यांनी गुरुवारी मुंबईत सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार तसेच सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्या ठिकाणी ते सव्वादोन तास होते. त्यानंतरही या वादावर कोणीही बोलायला तयार नाही. सिल्व्हर ओकमधून बाहेर पडल्यानंतरही पार्थ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तत्पूर्वी, दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली होती. या सर्व प्रकरणानंतर अजित पवार यांनी मात्र यावर कोणतेही भाष्य केले नाही, त्यामुळे त्यांच्या मनात काय चालले आहे, हे कळू शकले नाही. 

मुंबईतील या सर्व घडामोडीनंतर पार्थ पवार हे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक विशेषतः आपले काका यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. या सर्व घडामोडींशी संबंधित चर्चा ते आपले काका आणि नातेवाईकांशी करणार आहेत. त्यानंतर ते आपला निर्णय घेण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारही आज (ता. 14 ऑगस्ट) पुण्यात आहेत. आपल्या दैनंदिन कामाशिवाय ते त्या याबाबत काय बोलतात का, याकडे लक्ष लागले आहे. 

काटेवाडीत उद्या पवार कुटुंबीय भेटणार

दरम्यान, पार्थ पवार हे आई सुनेत्रा पवार यांच्यासह आज बारामतीत दाखल होणार आहेत, तर उद्या अजित पवार हे बारामतीत येणार आहेत. काटेवाडी येथील श्रीनिवास पवार यांच्या घरी उद्या (ता. 15 ऑगस्ट) पवार कुटुंबीय भेटणार आहेत. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com