अजितदादांनी लक्ष घालताच ऑक्‍सिजन, कोरोनावरील औषधे झाली उपलब्ध 

बारामतीसह अगदी इंदापूर, अकलूज, फलटण, दौंड, कर्जत, राशिन परिसरातूनही लोकांनी बारामतीत येत उपचार घेतले.
Oxygen, corona drugs available as soon as Ajit Pawar pays attention
Oxygen, corona drugs available as soon as Ajit Pawar pays attention

बारामती : बारामती शहरात निर्माण होणारा ऑक्‍सिजन आणि रेमेडीसेव्हर इंजेक्‍शनच्या तुटवड्याबाबत दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालताच कोरोना रुग्णांस लागणाऱ्या या दोन्ही गोष्टींचा पुरवठा सुरळीत होण्यास प्रारंभ झाला आहे. 

बारामतीमधील रुग्णालयांना मध्यंतरीच्या काळात ऑक्‍सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नव्हता. ही बाब अजित पवार यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना उच्चस्तरीय बैठक घेऊन ही परिस्थिती बदलण्यासंदर्भात निर्देश दिले. टोपे यांनीही या बाबत संबंधितांची बैठक घेत ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा, याबाबत तातडीने पावले उचलली. त्या मुळे रुग्णालयाच्या ऑक्‍सिजनचा प्रश्न मार्गी लागला आहे. 

दरम्यान, बारामतीतही रेमेडीसेव्हर इंजेक्‍शनच्या तुटवड्याबाबत माहिती मिळाल्यानंतर अजित पवार यांनी तातडीने आपले स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना या बाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी मुसळे यांनी या बाबत समन्वय साधून इंजेक्‍शनचा पुरवठा सुरळीत करण्याबाबत पाठपुरावा केला. पुणे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बेलकर यांनीही या प्रक्रियेत मोलाची मदत केली. 

कोरोनाच्या संकटाच्या काळात लोकांचे प्राण वाचणे, हे सर्वाधिक महत्वाचे समजून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने पावले उचलली. राज्याच्या कानाकोपऱ्यात ऑक्‍सिजन व रेमेडीमेसेव्हर इंजेक्‍शनचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने त्यांनी राजेश टोपे व राजेंद्र शिंगणे यांना समन्वयाच्या सूचना दिल्या होत्या. 

बारामतीसह अगदी इंदापूर, अकलूज, फलटण, दौंड, कर्जत, राशिन परिसरातूनही लोकांनी बारामतीत येत उपचार घेतले. औषधांची  उपलब्धता  असल्याचा फायदा या परिसरातील रुग्णांनाही झाला आहे. 

आरोग्यविषयक मदत तातडीने देण्यास प्राधान्य 

कोरोना महामारीच्या काळात बाकीच्या बाबी बाजूला ठेवून लोकांना तातडीने आरोग्यविषयक मदतीला अजित पवार यांनी प्राधान्य दिले आहे. सर्वांपर्यंत आरोग्यविषयक सेवा पोचणे, ही बाब त्यांनी प्राधान्यक्रमात ठेवली असल्याने बारामती पंचक्रोशीतील आरोग्य सेवेलाही गती मिळते आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com