उजनीच्या पाण्याबाबत विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी  ः इंदापूर राष्ट्रवादीचे आवाहन

या पाण्याला त्यांचा विरोध आहे की सपोर्ट हे त्यांनी जाहीर करावे.
Opposition should clarify its role on Ujani water : Indapur NCP's appeal
Opposition should clarify its role on Ujani water : Indapur NCP's appeal

निमगाव केतकी (जि. पुणे) :  उजनी (Ujani) धरणाच्या पाण्यावरुन सध्या संघर्ष पेटलेला आहे. इंदापूरचे (Indapur) हक्काचे रद्द केलेले पाणी परत मिळविण्यासाठी सर्वांनी राजकारण सोडून एकत्र यावे; अन्यथा पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. तालुक्यातील विरोधकांनीही (Opposition) या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नीरा डावा कालवा सल्लागार समितीचे माजी सदस्य अॕड. लक्ष्मणराव शिंगाडे (Laxmanrao Shingade) यांनी केले. (Opposition should clarify its role on Ujani water : Indapur NCP's appeal)

पुणे शहरातून उजनी धरणात येणाऱ्या सांडपाण्यातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्द केल्याने इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे आज (ता. २१ मे) शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारचा निषेध केला. त्या निषेध सभेत अॕड. शिंगाडे बोलत होते.

अॕड. शिंगाडे म्हणाले की, पुण्याची लोकसंख्या वाढत गेल्याने शहराला ९ टीएमसीवरून २२ टीएमसीपर्यंत पाणी द्यावे लागत आहे. यात इंदापूर तालुक्याचे पाणी कमी झाले. मागील पंधरा वर्षांत सणसर कटमधून पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्यामुळे उजनीत येणाऱ्या सांडपाण्यातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा अभ्यासपूर्ण निर्णय घेतलेला असताना या विरोधात सोलापूरकर एकत्र आल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतलेला निर्णय रद्द केला. हा निर्णय घेताना त्यांनी इंदापूरकरांना विचारात न घेतल्याने त्यांचा निषेध करतो.

हक्काचं पाणी मिळविण्याठी इंदापूर तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असताना तालुक्यातील विरोधक यावर काहीच बोलत नाही. या पाण्याला त्यांचा विरोध आहे की सपोर्ट हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही अॕड. शिंगाडे यांनी या वेळी दिले.

जलदूत भजनदास पवार यांनी या वेळी भविष्यातील पाण्याचे महत्व सांगितले. सरपंच रामदास शिंगाडे, उपसरपंच नितीन जाधव, प्रताप चवरे, रामभाऊ चवरे, राजेंद्र चवरे, बापूराव दुधाळ, आबासाहेब दुधाळ, अॅड. अशोक शिंगाडे, छगन शिंगाडे, चंद्रकांत जाधव, उमेश ननवरे, मारुती नाळे, तानाजी ननवरे, मच्छिंद्र भोंग, रसूल शिंदे, सचिन चवरे, शुभम शिंगाडे, तात्यासाहेब शिंगाडे, संजय शिंगाडे, बाळासाहेब शिंगाडे, हिरालाल ननवरे, शब्बीर सय्यद, शिवाजी राऊत, अक्षय शिंगाडे, रतन ननवरे, संतोष कोथमिरे, भिवा जाधव, बबन शिंगाडे, ईश्वर शिंगाडे, अशोक शिंगाडे, सुनील शिंगाडे, भाऊराव जाधव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com