...या भीतीमुळे विरोधक सोलापुरात जाऊन राज्यमंत्री भरणेंबाबत अपप्रचार करत आहेत

पालकमंत्री म्हणून भरणे यांनी पंधरा टीएमसी पाणी उजनीत आणण्यास सरकारची मान्यता घेतली आहे.
Opposition is going to Solapur and spreading disinformation about Minister of State Bharane
Opposition is going to Solapur and spreading disinformation about Minister of State Bharane

नीरा नरसिंहपूर (जि. पुणे)  ः इंदापूर तालुक्यातील 54 गावांतील शेतीसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी उचलण्यास राज्य सरकरने मान्यता दिली आहे. तत्पूर्वी उजनीत 15 टीएमसी पाणी वाढवून आणण्याचे आपले कर्तव्य बजावणारे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याबद्दल विरोधकांमध्ये पोटसूळ उठला आहे. आपले राजकीय अस्तित्व संपण्याच्या भीतीमुळे त्यांचे बगलबच्चे सोलापूर जिल्ह्यात जाऊन अपप्रचार करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रेय घोगरे यांनी केला.

उजनी धरणातून पाणी उचलण्याच्या निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते घोगरे बोलत होते. ते म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील आपले राजकीय अस्तित्व नष्ट होण्याच्या भीतीने विरोधकांच्या बगलबच्चेच्या माध्यमातून सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याबद्दल सोलापूर जिल्ह्यात जावून अपप्रचार केला जात आहे.

पालकमंत्री म्हणून भरणे यांनी पंधरा टीएमसी पाणी उजनीत आणण्यास सरकारची मान्यता घेतली आहे. उजनीतील सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे नियोजनातील एक थेंबही पाणी न घेता इंदापूर तालुक्यातील शेतीला 5 टीएमसी पाणी देण्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. 

विरोधकांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत इंदापूर तालुक्यातील पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न 50 वर्षांत न सोडवता लोंबकळत ठेवला. इंदापूर तालुक्याच्या शेती सिंचनाला पाणी उपलब्ध करणारे भगिरथ नेतृत्त्व राज्यमंत्री भरणे यांच्या कामाचे श्रेय बघवत नसल्याने विरोधक तीळपापड करून घेत आहेत. तालुक्यातील 143 गावांपैकी 54 गावांतील 63 हजार एकर शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्याचे श्रेय भरणे यांना मिळणार असल्यानेच विरोधक सोलापूर जिल्ह्यात अपप्रचार करत आहेत, असा आरोप घोगरे यांनी केला.

नीरा नदीवर सोमथळी, उद्धट व खोरोची बेटात तीन बॅरेजेस उभारून नीरा नदीचे उद्धट ते डाळ बोगद्याद्वारे दहा टीएमसी पाणी उजनी धरणात सोडले जाणार आहे. त्यामुळे उजनी जलाशयात जुलैपासूनच पाणी येण्यास सुरुवात होणार आहे. तसेच, मुंबईच्या विजेसाठी वापरले जाणारे मुळशी धरणाचे पाच टीएमसी पाणी विजेच्या बदल्यात पाहिजे, तेव्हा उजनी धरणात सोडता येणार आहे. अशाप्रकारे 15 टीएमसी पाणी वाढवून उजनीत आणण्यास मान्यता दिली आहे. अशाप्रकारे कोणाचेही पाणी पळविले नसताना विरोधी मंडळी योजना होऊ नये, यासाठी राजकारण करत आहे. 

या योजनेच्या आराखड्यासंदर्भात सहा महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, मुख्य सचिव तसेच मुळशी धरणाचे अविनाश सुर्वे यांच्यामध्ये मंत्रालयात बैठक झाली आहे. त्यात हा निर्णय घेण्यात आला होता, त्यामुळे विरोधकांनी विरोधासाठी विरोध न करता तालुक्यातील शेती सिंचनाचा पन्नास वर्षांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल राज्यमंत्री भरणे यांचे कौतुक करावे; अन्यथा तालुक्यातील जनता आपल्याला माफ करणार नाही, असा इशाराही दत्तात्रेय घोगरे यांनी दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com