पाटसकरांच्या घराचे काम फक्त अजित पवारच करू शकतात; मी शब्द टाकेन

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना हा विषय माहित असून हे काम होत नसल्याबद्दल त्यांनी यापूर्वीच नगरपरिषदेला पत्र पाठवून खंत व्यक्त केली आहे.
Only Ajit Pawar can do the work of former MLA Pataskar's house : Ulhas Pawar
Only Ajit Pawar can do the work of former MLA Pataskar's house : Ulhas Pawar

केडगाव (जि. पुणे) : काँग्रेसचे दिवंगत आमदार व स्वातंत्र सैनिक जगन्नाथ पाटसकर यांचे स्वातंत्र्य लढ्यात, तर त्यांचे धाकटे बंधू शाहीर बाळ पाटसकर यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फार मोठे योगदान आहे. अशा निःस्वार्थी देशभक्तांच्या कुटुंबांना साधे घर मिळविताना इतक्या यातना व्हाव्यात, याचे मोठे दुःख वाटते, अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केली. (Only Ajit Pawar can do the work of former MLA Pataskar's house : Ulhas Pawar)

भाड्याच्या घरात राहणारे पाटसकर यांनी दौंडमधील ग्रामीण रूग्णालय व एसटी स्थानक उभारण्यासाठी स्वतःची साडेसात एकर जमीन दिली. त्याबदल्यात सरकार त्यांना घर बांधून देणार होते. मात्र, घराचा प्रश्न गेली ३० वर्षे भिजत पडला आहे. याबाबत ‘सरकारनामा’ने हा प्रश्न उचलून धरल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, पाटसकर यांच्या घराबाबतच्या हालचालींना वरिष्ठ पातळीवर वेग घेतला आहे.

उल्हास पवार म्हणाले की, पाटसकर यांच्या घराचे काम फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हेच करू शकतात. मी अजित पवार यांना याबाबत शब्द टाकेन. तत्कालीन परिवहन मंत्री गोविंदराव आदिक आणि मी स्वतः चार वेळा या कामात लक्ष घातले होते. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार भि. ना. ठाकोर व वि. रा. उगले यांचा घराबाबत आग्रह होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना हा विषय माहित असून हे काम होत नसल्याबद्दल त्यांनी यापूर्वीच नगरपरिषदेला पत्र पाठवून खंत व्यक्त केली आहे.

दिवंगत स्वातंत्र सैनिक जगन्नाथ पाटसकर यांच्या कुटुंबीयांना दौंड शहरात जागा व पक्के घर बांधून देण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात कुल यांनी म्हटले की, पाटसकर यांना नगर पालिकेच्या ठरावाने जागा देण्याचा निर्णय डिसेंबर १९९० मध्ये घेण्यात आला होता. मात्र, आरक्षण व अन्य प्रशासकीय कारणांमुळे ही जागा पाटसकर यांना मिळण्यात अडचणी आल्या. पाटसकर यांनी जागा दिल्यानेच एसटी बसस्थानक व ग्रामीण रूग्णालय अशी दोन मोठी विकासकामे झाली आहेत. तीन दशके हा प्रश्न प्रलंबित आहे. दिवंगत आमदार सुभाष कुल व आमदार रंजना कुल यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. पाटसकर कुटुंबीय अद्याप भाड्याच्या घरात रहात असल्याने त्यांना तातडीने घरासाठी जागा व पक्के बांधकाम करून मिळावे.

दरम्यान, पालकमंत्री अजित पवार हे पाटसकर यांच्या घरासंदर्भात येत्या शनिवारी (ता. २४ जुलै) पुण्यात बैठक घेणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com