पुण्यात जो मतदान करून घेणार तोच विजयी होणार 

महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपने पुण्यात मतदार नोंदणीत आघाडी घेतली होती.
The one who gets the highest number of votes in Pune will win
The one who gets the highest number of votes in Pune will win

पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी तब्बल 62 जण रिंगणात आहेत. महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट लढत दिसत असली तरी काही अपक्ष उमेदवारांमुळे दोन्ही उमेदवारांना फटका बसण्याची शक्‍यता आहे. या शिवाय पुण्यात कोण अधिक मतदान करून घेतेय, त्यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. 

पाच जिल्ह्यांत पसरलेला तसेच मोठी लोकसंख्या असलेल हा मतदारसंघ आहे. पाच जिल्ह्यांत सर्वाधिक नोंदणी पुण्यात झाली आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपने पुण्यात मतदार नोंदणीत आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांनी उद्या होणाऱ्या मतदानात कायम राखली, तर महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ होणार आहे. 

या उलट महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड सांगली जिल्ह्यातून आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत त्यांनी आधीपासून तयारी केली आहे. महाविकास आघाडी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत मतदार नोंदणीत आघाडीवर होती. मात्र, प्रत्यक्ष मतदान करून घेण्यात ते कितपत यशस्वी होतात, त्यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. 

गेल्या वेळचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सारंग पाटील यांचे या मतदारसंघात सशक्त नेटवर्क आहे. त्यांची लाड यांना किती मदत होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गेल्या वेळी सारंग पाटील अधिकृत उमेदवार असताना लाड यांनी बंडखोरी केल्याने भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना आमदार होता आले. या वेळी लाड अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, ज्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी हवी होती, असे श्रीमंत कोकाटे, नीता ढमाले या दोन उमेदवारांनी निवडणुकीत रंगत आणली असून या दोन उमेदवारांनी घेतलेल्या मताचा फटका थेट राष्ट्रवादीचे उमेदवार लाड यांना बसण्याची शक्‍यता आहे. 

पुण्यातल्या रूपाली पाटील ठोंबरे या मनसेच्या उमेदवार रिंगणात आहेत. त्यांनी गेल्या 15 वर्षांत प्रचारात आघाडी घेतली असून लढाऊ कार्यकर्त्या अशी त्यांची प्रतिमा आहे. सोशल मीडियाच्या वापरात त्या आघाडीवर असून या माध्यमातून त्या राज्यभर लोकप्रिय आहेत. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांमध्ये सोशल मीडियावर त्यांचे सर्वाधिक फॉलोअर आहेत. 

रूपाली पाटील यांचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यांना मिळणाऱ्या मतांमधील 70 टक्के मते त्या उभ्या राहिल्या नसत्या तर भाजपला व 30 टक्के मते महाआघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्‍यता असल्याचे सांगण्यात येत आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com