ओंकार बाणखेले खूनप्रकरण : परराज्यात पळून जाणाऱ्या आरोपीस पकडले 

आंबेगाव आणि खेड तालुक्यातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक गुन्हेगार भूमिगत झाल्याची चर्चा आहे.
Omkar Bankhele murder case : Accused fleeing from the state caught :
Omkar Bankhele murder case : Accused fleeing from the state caught :

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील फकीरवाडी-एकलहरे येथे सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले (रा. मंचर) याचा गोळ्या घालून खून करण्यात आला. त्या गुन्ह्यातील संशयित आरोपी राम सुरेश जाधव (वय २२, रा. आंबेठाण, ता. खेड) हा परराज्यात पळून जाण्याच्या बेतात असताना त्याला राजगुरुनगर बस स्थानकातून अटक करण्यात आली. (Omkar Bankhele murder case : Accused fleeing from the state caught)

राम जाधव हा परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे. मंचर पोलिसांच्या ताब्यात जाधव याला देण्यात आलेले आहे. आतापर्यत दोन अल्पवयीन मुले आणि दोन गुन्हेगार अशा एकूण चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अजूनही काही आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केल्यामुळे आंबेगाव आणि खेड तालुक्यातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक गुन्हेगार भूमिगत झाल्याची चर्चा आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हत्येच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पुणे ग्रामीण व मंचर पोलिसांना दिला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आरोपी जाधव हा परराज्यात पळून जाणार असून तो राजगुरुनगर बस स्थानकावर येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार साध्या वेशातील पोलिस पथक बस स्थानकावर दबा धरून बसले होते. जाधव आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. 

ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले याच्या खूनप्रकरणातील आरोपी चैतन्य सत्यवान गायकवाड व राम सुरेश जाधव या दोघांना घोडेगाव न्यायालयाने शनिवारपर्यंत (ता. ७ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या गुन्ह्यातील अजूनही काही आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे, असे खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com