नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या वाढली... ! 

पुणे जिल्ह्यातदिवसभरात एकूण ३ हजार ३१३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ३ हजार ८९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
3Coro_20Pune.jpg
3Coro_20Pune.jpg

पुणे : कोरोनाच्या बाबतीत रविवारी (काल) पुणेकरांना दिलासा देणारी घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यात काल पहिल्यांदाच नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात काल (ता.२७) दिवसभरात एकूण ३ हजार ३१३ नवे  कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याऊलट तब्बल ३ हजार ८९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

यामुळे काल नव्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५८१ ने अधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख २८ हजार ४७६ झाली आहे. 

कालच्या एकूण नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ५४८ जण आहेत. पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ८१२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६६०, नगरपालिका क्षेत्रात २०८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ८५ नवे रुग्ण सापडले आहेत.

 दरम्यान, काल ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४१ रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील १७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १८ आणि  नगरपालिका क्षेत्रातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही शनिवारी (ता. २६) रात्री ९ वाजल्यापासून काल (ता. २७) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. 

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १ हजार ५९९, पिंपरी चिंचवडमधील ९१४, , जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार १६२,  नगरपालिका क्षेत्रातील २०१आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील १८ जण आहेत. दरम्यान, आतापर्यंत ६ हजार ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याच्या बाहेरील २३९ जण आहेत. 

नगरमध्ये आठवड्यात दोनदा कोरोना रुग्णवाढ 500 पर्यंत
 
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत 800 पेक्षा जास्तने वाढ होत होती. तथापि, मागील आठवड्यात दोनदा ही रुग्णसंख्या 500 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. काल 553 रुग्ण वाढले आहेत.जिल्ह्यात कालपर्यंत 684 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, एकूण 41 हजार 959 रुग्णसंख्या झाली आहे.

जिल्ह्यात काल ५१८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४१ टक्के इतके झाले आहे. काल रूग्णसंख्येत ५५३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ६०० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १७६ आणि अँटीजेन चाचणीत २७४ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४७, अकोले ३, जामखेड २, कर्जत १, नगर ग्रामीण ९, नेवासा १, पाथर्डी ३, राहुरी २, संगमनेर १, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ६, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा ३  अशा रुग्णांचा समावेश आहे.
 
अँटीजेन चाचणीत आज २७४ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा २३, अकोले २८, जामखेड १७, कर्जत २८, कोपरगाव २०, नगर ग्रामीण २०, नेवासा १५, पारनेर ४, पाथर्डी २२, राहाता २१, राहुरी २, संगमनेर ३८, शेवगाव २०, श्रीगोंदा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com