रेशन कार्ड नाही? 'हा' पुरावा दाखवा, मोफत तांदूळ मिळवा! - No ration card? Show Aadhaar card, get free rice! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

रेशन कार्ड नाही? 'हा' पुरावा दाखवा, मोफत तांदूळ मिळवा!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

आधारकार्ड क्रमांक किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्याची पुराव्यासाठी स्वतंत्र नोंद करण्यात येईल.

पुणे : रेशन कार्ड नसलेल्या व्यक्तींनाही आता प्रत्येकी पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोफत तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.

मे आणि जून या दोन महिन्यांचे धान्य वितरण लाभार्थ्यांना जून महिन्यापासून ऑफलाईन पध्द‍तीने करण्यात येणार आहे, अशा लाभार्थ्यांकडून त्यांचे आधारकार्ड क्रमांक किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्याची पुराव्यासाठी स्वतंत्र नोंद करण्यात येईल.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकूण 113 अन्नधान्य वितरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. याबाबत 22 मे रोजी आदेश पारित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत एकूण 1 लाख 39 हजार 882 लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.

यासाठी संबंधित परिमंडल अधिकारी, तलाठी, स्थानिक नगरसेवक आणि अन्नधान्य वितरण केंद्रे यांच्यामार्फत विनारेशन कार्डधारकांना विहीत नमुन्यातील अर्ज वाटप केले जाणार आहेत. अर्ज जवळच्या अन्नधान्य वितरण केंद्रात 30 मेपर्यंत जमा करायचे आहेत.

ज्या अन्नधान्य वितरण केंद्रामध्ये अर्ज भरुन देतील त्याच अन्नधान्य वितरण केंद्रातून संबंधित व्यक्तींना अन्नधान्याचे वितरण करण्यात येईल. अन्नधान्य घेताना या अर्जाची पोच सोबत आणणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी आपले अर्ज 30 मे पर्यंत जमा करावे, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले आहे.
 

  1. मे आणि जून महिन्याचा मोफत तांदूळ
  2. 1 लाख 40 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार
  3. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासाठी 113 अन्नधान्य वितरण केंद्रे  
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख