फुकट बिर्याणी क्लिप : त्या पोलिस उपायुक्तांची सायबर सेलकडे अद्याप तक्रार नाही

फुकट बिर्याणीच्या वादामुळे पुणे पोलिसांच्या प्रतिमेची चव गेली..
priyanka Narnaware IPS
priyanka Narnaware IPS

पुणे : हाताखालील कर्मचाऱ्याला फुकट बिर्याणी आणण्याचा आदेश देणारी एका महिला पोलिस अधिकाऱ्याची आॅडिओ क्लिप चार दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यावरून पोलिस दलाच्या प्रतिमेविषयी प्रश्न निर्माण झाले. मात्र ही क्लिप माॅर्फ केलेली असल्याचा दावा यातील महिला अधिकारी व पुणे पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी केला होता. तसेच या विरोधात सायबर तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. मात्र दोन आॅगस्टच्या सायंकाळी पाचपर्यंत ही तक्रार आली नसल्याचे सायबर कडून सांगण्यात आले.

या क्लिप प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले आहेत. त्यावरही अद्याप अधिकृत आदेश जारी झालेला नाही. नारनवरे यांचीही तक्रार दाखल झालेली नाही. पोलिस कर्मचारी महेश साळुंखे आणि  ज्ञानेश्वर पालवे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. मी शिस्तप्रिय अधिकारी असून मी इथे आल्यामुळे अनेकांचे हितसंबध दुखावले गेले आहेत. हप्ता वसुलीचे त्यांचे रॅकेट आहे, असा गैाप्यस्फोट नारनवरे यांनी केला होता.

आयपीएस असलेल्या नारनवरे यांनी तक्रार करूनही या दोन्ही कर्मचाऱ्यांवरही अद्याप कारवाई झालेली नाही. तसेच त्यांना महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शाखेत आणि पोलिस ठाण्यात त्यांची बदली झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही या कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर त्यांना वाचविणारे कोण आहेत, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

या वादावर बोलताना नारनवरे यांनी परिमंडळ एकच्या आधीच्या उपायुक्तांवर या प्रकरणी दोष ठेवला होता. हे कर्मचारी त्यांच्याशी संबंधित असल्याचे म्हटले होते. आधीच्या उपायुक्त तेथे स्वप्ना गोरे होत्या. नारनवरे यांची परिमंडळ एकला नियुक्ती झाल्यानंतर गोरे यांची उपायुक्त (मुख्यालय) म्हणून बदली झाली होती. ती तशी कमी महत्वाची पोस्ट मानली जाते. गोरे डीवायएसपी म्हणून  भरती झाल्यानंतर त्या उपायुक्त झाल्या आहेत. नारनवरे या थेट आयपीएस आहेत. त्यामुळे या वादाला IPS विरुद्ध राज्यसेवा अशीही संघर्षाची किनार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा वाद कायदेशीरदृष्ट्या खेळला जाणार की दोन्ही बाजूंनी त्यावर तडजोड केली जाणार, याची आता पोलिस दलात उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com