म्हणून सुप्रिया सुळेंनी मानले अजितदादांचे आभार

नीरा डावा कालवा येत्या काही दिवसांत सौंदर्यस्थळ म्हणून ओळखला जाणार आहे.
Sarkarnama Banner - 2021-08-11T121449.118.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-11T121449.118.jpg

पुणे : बारामती शहरातील माळावरची देवीचे मंदिर ते जळोची साठवण तलाव, देवीचे मंदिर ते परकाळे बंगला पूल व घारे इस्टेट साठवण तलाव ते अवधूतनगरपर्यंत सिमेंट कॉंक्रीटच्या अस्तरीकरणाचे काम सुरु झाले आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूंचा भराव व तळ असे पूर्ण अस्तरीकरण केले जात आहे. हे काम अंतीम टप्प्यात आले आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. 

बारामती शहरातून वाहणारा नीरा डावा कालवा येत्या काही दिवसांत सौंदर्यस्थळ म्हणून ओळखला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुरदृष्टीतून याबाबतचा प्रकल्प आखण्यात आला आहे. तो लवकरच पुर्णत्वास जाईल. ब्रिटीशकाळात बांधण्यात आलेल्या या कालव्याची वहनक्षमता गाळ व इतर कारणांमुळे कमी झाली होती. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा या उद्देशाने त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. 

याशिवाय कालव्यालगत सुशोभिकरण केले जाणार आहे. यामध्ये जॉगिंग व रनिंग ट्रॅक, सायकलींग ट्रॅक,नागरिकांसाठी सोळा ठिकाणी विरंगुळा केंद्रे, लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांसाठी सुविधा, योगा व प्राणायामसाठी ठिकाणे विकसीत करणे आणि परकाळे पूलानजिक नवीन पूल विकसीत आदींचा समावेश आहे. हा अतिशय चांगला उपक्रम राबविल्याबद्दल अजितदादांचे Ajit Pawar मनापासून आभार,असे सुळे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार ; मदिरेचा विषय बाजूला ठेऊन मंदिरं उघडा 
बारामती शहरामधून वाहणारे कऱ्हा नदीचे सुमारे पाच किमी लांबीचे पात्र असून येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने तीन टप्प्यांमध्ये 'नदीसुधार प्रकल्प' राबविण्यात येत आहे. यातील पहिला टप्पा असणारा सांडपाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. यामुळे परिसर दुर्गंधीमुक्त राहणार असून यामध्ये तांत्रिक पद्धतीने नदीकाठाचे संरक्षण करणे, नदीकाठाची सुधारणा करणे, प्रदूषण कमी करणे यांसह नदीकाठाचे सुशोभिकरण करणे यांचा समावेश आहे.या अतिशय महत्वाच्या उपक्रमात पाच किमी अंतराची गॅबियन वॉल उभारण्यात येणार आहे. 

अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून हा प्रकल्प साकारत आहे. यामुळे बारामती शहराच्या विकासात व सौंदर्यात भर पडणार आहे याशिवाय नदी सुधारणेचा एक नवा पॅटर्न उभा राहणार आहे.  याबद्दल अजितदादांचे  सुप्रियाताईंनी आभार मानले आहेत.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com