त्या मंत्र्यांला पदावरुन हटवण्याचा निर्णय तीनही पक्ष मिळून घेतील... - Neelam Gorhe reaction in Pooja Chavan case | Politics Marathi News - Sarkarnama

त्या मंत्र्यांला पदावरुन हटवण्याचा निर्णय तीनही पक्ष मिळून घेतील...

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई होईल.

पुणे : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्यात. निःपक्षपातीपणे याचा तपास होईल, अशी ग्वाही शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. सोबतच जे आरोप करत आहेत त्यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित करत या गोष्टीचे राजकारण करू नये, असेही गोऱ्हे म्हणाल्या. त्या पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. 

यावेळी गोऱ्हे म्हणाल्या की, मृत्यू संशयास्पद झालेला आहे, यात कोणतीही शंका नाही. परंतु, पूजा चव्हाणच्या मृतदेहाचा पीएम रिपोर्ट अजून यायचा आहे. व्हायरल झालेल्या क्लिपबाबत व्हॉइस सॅम्पल पहावे लागणार आहे. त्याचाही तपास करण्यात येईल. कोणत्या पक्षाचा असा हा विषय नाही. प्रकरणाचा पूर्ण तपास होईपर्यंत निष्कर्ष काढणे योग्य नाही. निःपक्षपातीपणे तपास होईल याची ग्वाही देते. त्यांना मंत्रीपदापासून दूर करायचे का नाही हा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील, असे म्हणत विरोधकांच्या मागणीवर नीलम गोऱ्हे यांनी भूमिका स्पष्ट केली. 

जे सरकारवर आरोप करत आहेत, त्यांच्यापैकी कोणीच पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याची टीका गोऱ्हे यांनी केली. उगाच कोणत्याही गोष्टीचे राजकारण करू नये, असे त्या म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण प्रकरणात स्पष्ट केले आहे. की प्रकरणाचा सखोल तापस करण्यात येईल. त्यामुळे शंका घेण्याचे काही कारण नाही.  

क्लिपमधील आवाज कोणाचा, हे सर्वांना माहीत; पण ते लपवलं जातंय 

पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात वेगवेगळ्या बातम्या व्हायरल होत आहेत. व्हायरल ऑडियो क्लिपवर बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, की लीक होणाऱ्या माहितीच्या आधारे बातमी देताना काळजी घेतली पाहिजे. याआधीच्या प्रकरणात अशाच लीक माहितीवर बातम्या दिल्या गेल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागल्याची उदाहरणे आहेत. या प्रकरणात असे होऊ नये त्यामुळे लीक माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची वरिष्ठांकडून खातरजमा करुण घ्या, असा सल्लाही गोऱ्हे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिला.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे...

टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, एखाद्याच्या आयुष्याशी खेळायला नको. चौकशीतून सत्य काय ते बाहेर येईल, `याबद्दल सखोल चौकशी केली जाईल. एखाद्याला आयुष्यातून उठवायचे प्रयत्नदेखील व्हायला नको. गेले काही दिवस काही महिने आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेही दिसून आले. असेही व्हायला नको. त्याची सखोल तपासणी केली जाईल आणि जनतेला सत्य काय ते कळेल,`` अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली होती.  

पूजा चव्हाणचा मोबाईल मिळवण्याचा प्रयत्न करणारी 'ती' व्यक्ती कोण?
 

पूजा चव्हाण हिचा मृत्यूशी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. विरोधी पक्षांनी राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यावर काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी चार वाक्यांतच आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी थेट राठोड यांचा थेट राजीनामा घेतलेला नाही किंवा क्लिन चिटही दिलेली नाही. चौकशी करणार असल्याचे सांगितल्याने त्यानंतरच राठोड यांचे राजकीय भवितव्य ठरणार असल्याचे दिसून येत आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख