राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे कोरोनामुळे निधन

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजूबापू पाटील (वय ५८) यांचे गुरुवारी (ता. १३ ऑगस्ट) पहाटे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले.
NCP's Solapur district working president Rajubapu Patil passed away due to corona
NCP's Solapur district working president Rajubapu Patil passed away due to corona

पंढरपूर : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजूबापू पाटील (वय ५८) यांचे गुरुवारी (ता. १३ ऑगस्ट) पहाटे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले.

सोलापूर येथील अश्विनी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील एकाचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता. त्यानंतर राजूबापू पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगा, भाऊ महेश यांना कोरोना विषाणूची बाधी झाली होती.

त्यांच्यावर सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येत होते. यामध्ये त्यांचे बंधू महेश पाटील यांचाही मागील आठ ते दहा दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारी (ता. १३ ऑगस्ट) पहाटे राजूबापू पाटील यांचाही उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या सदस्या प्रफ्फुलता पाटील यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

राजूबापू पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्या भोसे गावावर शोककळा पसरली आहे. राजूबापू पाटील यांनी २००४ मध्ये पंढरपूर विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवली होती. ते अनेक वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. अलीकडे त्यांनी कृषीराज साखर कारखान्याची उभारणी केली होती. गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ते काम पाहात होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. रयत शिक्षण संस्थेच्या बाॅडीवर देखील ते काम करत होते. पंढरपूर तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे पंढरपूर तालुका एका उमद्या नेतृत्वाला मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Edited by Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com